शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सुरक्षेतील उणीवा दूर, यंत्रणाही सक्षम - देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 6:28 AM

२६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत.

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत. गोळीबारापासून गर्दीच्या ठिकाणी भरधाव गाडी घुसविण्याचेही तंत्र आता वापरले जात आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधातील लढ्यात आता जनसामान्यांचा सहभाग आवश्यक बनल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.२६/११ च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेश कुमार, लेफटनंट जनरल विश्वंभर सिंह, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या रेश्मा जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, २६/११चा दहशतवादी हल्ला हा देशाच्या आर्थिक केंद्रस्थानावर केलेला हल्ला होता. या हल्ल्यानंतर राज्यात ‘एनएसजी’च्या धर्तीवर फोर्सवनची स्थापना करण्यात आली. समुद्री सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडे आता सर्वात आधुनिक कंट्रोल रूम आहे. अशी व्यवस्था २६/११ लाअसती तर जवान आणि अधिकाºयांना आपला जीव गमवावा लागला नसता, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.तर, देशांतर्गत व सीमेवरील सुरक्षासंदर्भात उल्लेखनीय कार्य होतअसून नक्षली कारवाईचे प्रमाण वीस टक्क्यांनी कमी झाल्याचे गृहराज्यमंत्री अहीर यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट नवीन बनावटीची उपकरणं, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी दिला जाईल. त्यात कमतरता पडू देणार नसल्याचे अहिर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस