शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

पुन्हा एल्गार! मराठा आरक्षण आंदोलन २ नोव्हेंबरपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 06:54 IST

काळ्या फिती, झेंडे लावून बेमुदत उपोषण; सरकारला घेरण्यासाठी विविध गटांची घोषणा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाने सरकारला घेरण्यासाठी विविध आंदोलनांची घोषणा केली आहे. २ नोव्हेंबरला आझाद मैदानात काळ्या फिती आणि काळे झेंडे घेऊन बेमुदत उपोषणाने आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर १५ नोव्हेंबरनंतर आदोलनाचे स्वरूप तीव्र होईल, अशी माहिती सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वय प्रा. संभाजी पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरची मुदत मागितली होती. त्यामुळे आरक्षण प्रश्नावर १५ नोव्हेंबरनंतरच आंदोलनाला सुरुवात होईल. मात्र आरक्षणप्रश्नी पुकारलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान ज्या मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यासह सारथी संस्थेचा कारभार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह यांसह विविध मागण्यांवर अद्याप अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडून यासंदर्भात मराठा समाजाची दिशाभूल होत आहे. छत्रपती संभाजी राजे यांना खासदारकी, नरेंद्र पाटील यांना महामंडळ, सदानंद मोरे यांना सारथी संस्थेचे लाभाचे पद देऊन सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या प्रलोभनांचा समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट दिवाळीनंतर आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.सरकारने उपोषणाची दखल न घेतल्यास १६ नोव्हेंबरपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते जनावरे घेऊन मंत्रालय आणि ‘वर्षा’वर धडकतील. सर्व आंदोलने अहिंसेच्या मार्गाने होतील. आरक्षण प्रस्ताव विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. सकल मराठा क्रांती ठोक मोर्चानेही २० नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसण्याची घोषणा केली. तर २१ नोव्हेंबरपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.‘मराठा क्रांती मोर्चा या पक्षाला पाठिंबा नाही’‘मराठा क्रांती मोर्चा’ नावाने पक्ष स्थापना करणाऱ्यांना पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण सकल मराठा क्रांती मोर्चाने दिले आहे. मराठा क्रांती मोर्चाची स्थापना मराठा भगिनीवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि मराठा आरक्षणासाठी झाली आहे. तो उद्देश पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारवर दबावतंत्र म्हणून समाज एकवटला आहे. त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ शकत नाही. परिणामी, अशा कोणत्याही पक्षाला समाज पाठिंबा देणार नसल्याचे मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण