शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार डॉक्टरांचा राज्य सरकारविरोधात 'एल्गार'; १४ दिवस होणार 'सेल्फ क्वारंटाईन' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 11:57 IST

राज्याच्या ४५००० डॉक्टरांकडून ७ सप्टेंबर पासून राज्यात सर्वत्र संघर्षाचा पवित्रा घेत विविध मार्गाने लढा दिला जाणार आहे..

ठळक मुद्देआयएमएतर्फे मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात येणारडॉक्टरांवरील दडपशाहीबद्दल सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना सविस्तर निवेदने दिली जाणार

पुणे : कोरोनाची महामारी सुरु झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने आणि आरोग्य सचिवांपासून सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 'आयएमए'च्या आणि इतर सर्व खाजगी डॉक्टरांवर सतत अन्याय केला आहे. परंतु, आता महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे स्वत:ला 'सेल्फ क्वारंटाइन' करून घेतले आहे, त्याप्रमाणे डॉक्टरसुध्दा सामुदायिकरित्या ‘सेल्फ क्वारंटाइन’ करून घेणार आहे. या विलगीकरणाची मुदत १४ दिवसांपर्यंत असू शकेल.तसेच महाराष्ट्रातील' इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या सर्व शाखा १० सप्टेंबर रोजी सकाळी आपापल्या शाखेसमोर किंवा एखाद्या प्रमुख ठिकाणी सकाळी ११ वाजता एकत्र जमून आपल्या मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतींची होळी करणार आहे. 

शासनाच्या या निर्णयाविरुध्द 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या राज्याच्या २१६ शाखांमधील ४५००० डॉक्टरांकडून सोमवार, ७ सप्टेंबर पासून राज्यात सर्वत्र संघर्षाचा पवित्रा घेत विविध मार्गाने लढा दिला जाणार आहे. आयएमएतर्फे मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. रुग्णालयाचे दर एकतर्फी ठरवून डॉक्टरांच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे. 

१० सप्टेंबरपासून आठवड्याभरात आयएमएच्या सर्व शाखा त्यांच्या विभागातील प्रशासकीय अधिका-यांच्या कार्यालयासमोर शांततामय निदर्शने करून निवेदन देतील.डॉक्टरांवरील दडपशाहीबद्दल सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना सविस्तर निवेदने दिली जाणार आहेत. मुंबईत आझाद मैदान येथे डॉक्टरांची महारॅली आयोजित करून शांततामय निदर्शने करण्यात येतील आणि मंत्री मंडळात तसेच विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडण्याचा प्रस्ताव देण्यात येईल.कोव्हिड रुग्णाच्या उपचारात मृत्युमुखी पडलेल्या सहकारी शहीद डॉक्टरांच्या स्मरणार्थ ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर्व डॉक्टर्स आपापल्या दवाखान्यांसमोर एकत्रित होऊन १० मिनिटे मूक श्रद्धांजली वाहतील. त्याच दिवशी रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक आयएमए शाखेच्या ऑफिससमोर अथवा गावातील प्रमुख ठिकाणी शहीद डॉक्टरांचे प्रातिनिधिक पोस्टर लावतील आणि त्याच्या खाली प्रत्येक आयएमए सदस्य एक पणती किंवा मेणबत्ती लावून त्यांना श्रद्धांजली वाहील. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार