शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश : आता १० कॉलेजांचाच पर्याय

By admin | Updated: January 10, 2017 05:09 IST

यंदा मुंबई, पुण्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रडतखडत आॅनलाइनद्वारे पूर्ण झाल्यावर पुढच्या शैक्षणिक वर्षात २०१७-१८मध्ये नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथेही अकरावी

मुंबई : यंदा मुंबई, पुण्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रडतखडत आॅनलाइनद्वारे  पूर्ण झाल्यावर पुढच्या शैक्षणिक वर्षात २०१७-१८मध्ये नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथेही अकरावी प्रवेश आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्सेसचे सर्व प्रवेशदेखील आॅनलाइन पद्धतीनेच देण्यात येणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशअर्ज भरताना किमान १ ते कमाल १० कॉलेजांचा पर्याय देता येईल. अकरावी आॅनलाइन प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, विज्ञान, वाणिज्य शाखांपैकी फक्त एकाच शाखेची मागणी करता येणार आहे. तर, विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार प्रवेश अर्जातील भाग २मध्ये शाखा बदलून पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात  येणार आहे. याआधी आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ५०  महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची मुभा होती. पण, आता विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश अर्ज भरताना पहिल्या फेरीत संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील कोणतेही किमात १ ते कमाल १० उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येतील. पहिली फेरी पूर्ण झाल्यावर मात्र १ ते १० पसंतीक्रमाची अट राहणार नाही. कोणत्याही कारणास्तव अकरावीत झालेले प्रवेश रद्द झाल्यास महाविद्यालयांना त्याची नोंद संकेतस्थळावर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या  प्रवेश फेरीनंतर विद्यार्थ्याला उपलब्ध रिक्त जागांनुसार फेरीपूर्वी निश्चित केलेला पसंतीक्रम बदलता येणार आहे. दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्याने पसंतीक्रम बदलला नाही तर आधीच्या पसंतीक्रमाप्रमाणेच त्याला प्रवेश देण्यात येईल. पहिला पसंतीक्रम दिलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यास त्याला संपूर्ण शुल्क भरून प्रवेश घेणे बंधनकारक राहील. पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त अन्य महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यास पूर्ण शुल्क भरून तो प्रवेश घेऊ शकतो. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील यादीत समाविष्ट होणार नाहीत. तर, महाविद्यालयात प्रवेशासाठी नाव लावल्यावर देखील प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या यादीत पसंतीक्रम बदलता येणार नाही. इयत्ता अकरावीत प्रवेश घेणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीनेच होणार आहे. अशा असतील राखीव जागा...शासनाच्या समान आरक्षण धोरणानुसार, महिलांसाठी ३०  टक्के, अपंगांसाठी ३ टक्के, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी ५ टक्के, क्रीडा व कला क्षेत्रात  प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३ व २ टक्के, बदलीने आलेल्या राज्य, केंद्र, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, पाल्य, आजी-माजी सैनिकांच्या पत्नी, पाल्य, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांच्यासाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)कधी होणार आॅनलाइन प्रवेश सुरू?आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे चार नियमित फेऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ जून ते १५ जुलै या कालावधीत चार फेऱ्या घेण्यात येणार आहेत. १५ जुलै ते १ सप्टेंबर या कालावधीत दोन आठवड्यांत एक याप्रमाणे तीन अतिरिक्त फेऱ्या होतील.