अकरा वर्षांच्या भावाने घोटला चिमुकल्या बहिणीचा गळा!

By Admin | Updated: August 11, 2015 01:22 IST2015-08-11T01:22:13+5:302015-08-11T01:22:13+5:30

खेळण्या- बागडण्याच्या, मौजमस्ती करण्याच्या वयात ११ वर्षांच्या भावाने चार वर्षांच्या चुलत बहिणीचा गळा घोटून खून केल्याची धक्कादायक घटना

The eleven-year-old brother snatched a little finger! | अकरा वर्षांच्या भावाने घोटला चिमुकल्या बहिणीचा गळा!

अकरा वर्षांच्या भावाने घोटला चिमुकल्या बहिणीचा गळा!

बिडकीन (जि. औरंगाबाद) : खेळण्या- बागडण्याच्या, मौजमस्ती करण्याच्या वयात ११ वर्षांच्या भावाने चार वर्षांच्या चुलत बहिणीचा गळा घोटून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी बिडकीन परिसरातील जैतापूर- पैठणखेडा शिवारात घडली.
चुलत्याने दोन वर्षांपूर्वी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठीच अल्पवयीन मुलाने त्याची चुलत बहीण शामल कालीस काळे (४) हिचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. बिडकीन पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शामल आई-वडिलांसोबत जैतापूर शिवारात राहत होती. बाजूलाच तिचे अन्य दोन चुलते कुटुंबासह राहतात. तिचे वडील आणि आई रविवारी हर्सूल जेलमध्ये अटकेत असलेल्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी गेलेले होते. त्यामुळे शामल घरी एकटीच होती. सायंकाळी साडेसहाला शामलची आई घरी आली. तेव्हा घरासमोरच्या पलंगावर ती निपचित पडलेली दिसली. तिचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांना पाहताच तिचा चुलत भाऊ गांगरून गेला. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला. (वार्ताहर)

दोन वर्षांपूर्वी शामलच्या वडिलांनी तिच्या चुलत भावाला मारले होते. त्याचा बदला घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तो संधी शोधत होता, असे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन आरोपीने खुनाची कबुली देऊन पोलिसांना घटनाक्रम सांगितला.

Web Title: The eleven-year-old brother snatched a little finger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.