सुनेची कु-हाडीने हत्या करून सासरा फरार
By Admin | Updated: November 4, 2016 10:57 IST2016-11-04T10:40:08+5:302016-11-04T10:57:35+5:30
सोलापुरात सुनेवर सास-यानेच कु-हाडीने वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

सुनेची कु-हाडीने हत्या करून सासरा फरार
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 4 : सुनेवर सास-यानेच कु-हाडीने वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावातील ही धक्कादायक घटना आहे.
पार्वत मगी असे मृत महिलेचे नाव असून त्या 34 वर्षांच्या होत्या. पार्वती यांची हत्या केल्यानंतर त्यांचा सासरा फरार झाला आहे. पोलीस आरोपी सास-याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पार्वती यांची हत्या करण्यामागचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस पथक आणि श्वान पथक दाखल झाले असून हत्येसाठी वापरण्यात आलेली कु-हाड त्यांनी ताब्यात घेतली आहे.