शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

दापचेरी तपासणी नाक्यावर इलेक्ट्रॉनिक पावती मिळणार

By admin | Published: September 01, 2015 1:26 AM

परिवहन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सीमा तपासणी नाके भ्रष्टाचाराचे आगारच मानले जातात. हा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण करण्याचा

मुंबई : परिवहन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सीमा तपासणी नाके भ्रष्टाचाराचे आगारच मानले जातात. हा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ठाण्यातील दापचेरी येथील सीमा तपासणी नाक्याचे आधुनिकीकरण करण्यात आले असून मालवाहतूकदारांना इलेक्ट्रॉनिक पावती दिली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रकच परिवहन विभागाकडून काढण्यात आले आहे. राज्यात २२ सीमा तपासणी नाके असून मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाला चांगलेच उत्पन्न मिळते. मात्र या सीमा तपासणी नाक्यांना गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराने वेढले. ओव्हरलोड वाहनांना काही सीमा तपासणी नाक्यांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कारवाई न करताच सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. यात तर तत्कालिन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी काही महिन्यांपूर्वी दापचेरी येथे टाकलेल्या छाप्यात तपासणी नाक्यांवरील भ्रष्टाचारही उघडकीस आला होता. यानंतर झगडे यांनी निर्बंध आणण्यासाठी अहवालही तयार केला होता. त्याचप्रमाणे त्यापूर्वीचे परिवहन आयुक्त व्ही.एन.मोरे यांनी तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष लक्ष दिले होते. सीमा तपासणी नाक्यांचा आधुनिकीकरणासाठी सरकारकडून पुढाकार घेण्यात आला आणि त्या दृष्टिने दापचेरी येथे आधुनिक यंत्रणा उभारण्यात आली. यात मालवाहू गाड्यांची इलेक्टॉनिक वजन काट्यांमार्फत वजन होऊन कंम्प्युटराईज पावती मिळेल. त्यामुळे ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण येईल, अशी आशा परिवहन विभागाकडून व्यक्त केली जात आहे.