वीज महागणार?
By Admin | Updated: January 2, 2015 02:44 IST2015-01-02T02:44:58+5:302015-01-02T02:44:58+5:30
राज्यभरातील घरगुती ग्राहक अगोदरच २० टक्के वाढीव विज बिलाने पोळलेले असतानाच त्यांना आणखी एक शॉक बसण्याची शक्यता आहे.
वीज महागणार?
मुंबई : राज्यभरातील घरगुती ग्राहक अगोदरच २० टक्के वाढीव विज बिलाने पोळलेले असतानाच त्यांना आणखी एक शॉक बसण्याची शक्यता आहे. तूट भरून काढण्यासाठी महावितरणने राज्य विद्युत नियामक आयोगाकडे आणखी १२ टक्के विज दरवाढीची मागणी केली आहे. आयोगाने महावितरणच्या बाजूने निर्णय दिल्यास येत्या काळात ग्राहकांना आणखी १२ टक्के दरवाढीचा फटका बसू शकतो, अशी शक्यता वीज क्षेत्रातील तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रताप होगाडे म्हणाले, शेतकरी, यंत्रमाग, उद्योजक आणि ३०० युनिट्सच्या आतील घरगुती ग्राहकांचे दर स्थिर ठेवावेत व टप्प्याटप्प्याने महानिर्मितीची कार्यक्षमता वाढेल व महावितरणची वीजगळती कमी होईल तसतशी सबसिडी कमी करण्यात यावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील वीज वितरण गळती फक्त १४ टक्के आहे, असे दाखविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)