शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 05:48 IST

पाच वर्षांत वीज खरेदीत ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचा फायदा घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजदर कपातीच्या स्वरूपात येत आहे.

मुंबई : गेल्या अडीच वर्षांत वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे पुढील पाच वर्षांत वीज खरेदीच्या खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्याचा लाभ वीज ग्राहकांना देताना पुढील पाच वर्षांसाठी विजेचे दर कमी केले आहेत. नवीकरणीय (रिन्युएबल) ऊर्जेवर भर दिला असून, त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षांनंतर वीजदरात आणखी घट होईल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिली.

लोकेश चंद्र यांनी सांगितले की,  विजेची गरज लक्षात घेऊन २०३४-३५ या वर्षापर्यंत विजेसाठीचे नियोजन केले आहे. पाच वर्षांत राज्याची विजेची क्षमता ४५ हजार मेगावॉटने वाढविण्यासाठी वीज खरेदी करार केले आहेत. त्यात प्रामुख्याने सौर, पवन, पंप स्टोरेज, बॅटरी स्टोरेज, यावर भर दिला आहे. त्यामुळे वीज स्वस्त दरांत मिळणार आहे. 

परिणामी पाच वर्षांत वीज खरेदीत ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचा फायदा घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजदर कपातीच्या स्वरूपात येत आहे.

‘सूट हवी तर स्मार्ट मीटर बसवा’ 

वीज कधी वापरली, त्यानुसार वीजदर निश्चित करण्याला ‘टीओडी’ म्हणतात. आतापर्यंत घरगुती ग्राहकांना ही सुविधा नव्हती. पण, आता त्यांना ही सवलत मिळेल. 

सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत वापरलेल्या विजेच्या दरांत पहिल्या वर्षी अतिरिक्त ८० पैसे प्रति युनिट सूट मिळेल. त्यासाठी घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट मीटर असणे गरजेचे आहे. स्मार्ट मीटर मोफत देण्यात येत आहेत. १ जुलैपासून ही सवलत सुरू होणार आहे.

सौर कृषी वाहिनी योजनेमुळे दिलासा

वीज खरेदीच्या बचतीमध्ये ‘सौर कृषी वाहिनी योजना २.०’ चा  वाटा आहे. कृषी पंपांसाठी दिवसा वीज देण्यासाठीच्या १६ हजार मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून सरासरी तीन रुपये प्रति युनिट इतक्या कमी दरांत वीज मिळणार आहे. या उपायांमुळे वीज खरेदी खर्चात बचत होणार आहे.

उद्योगांचे वीज दर कमी होतील

उद्योगांना वीज दरांमध्ये मिळणाऱ्या सवलतींचा विचार केला तर उद्योगांसाठी दर स्पर्धात्मक आहेत. पाच वर्षांत उद्योगांचे वीजदर आणखी कमी होत जातील. गुजरात, तामिळनाडू अशा औद्योगिक मागणी जास्त असलेल्या राज्यांपेक्षा कमी होतील.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbillबिल