ठाण्यात विविध भागांमध्ये आज वीजपुरवठा बंद

By Admin | Updated: April 29, 2016 03:24 IST2016-04-29T03:24:55+5:302016-04-29T03:24:55+5:30

वीज वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम २९ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार आहे.

Electricity supply closure in various parts of Thane today | ठाण्यात विविध भागांमध्ये आज वीजपुरवठा बंद

ठाण्यात विविध भागांमध्ये आज वीजपुरवठा बंद

मुंबई : ठाण्यातील वागळे इस्टेटमधील महावितरणच्या कोलशेत उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील २२ के.व्ही. हायपरसिटी चेन्ना आणि २२ के.व्ही. न्यू कॉम्प्लेक्स, ठाणे नागरी विभाग-२च्या कार्यक्षेत्रातील २२ के.व्ही. कळवा-१ या वीज वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम २९ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या वीजवाहिनीवरील परिसरांचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद राहील, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
२२ के.व्ही. हायपरसिटी चेन्ना या वीज वाहिनीवरील काजूपाडा, चेन्ना, गोल्डेन व्हॅली, एबी इंटरप्राईजेस, नागला बंदर, शंकर मंदिर, एससी, भार्इंदर पाडा या परिसरांचा वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद राहील.

Web Title: Electricity supply closure in various parts of Thane today