शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Electricity: ऊर्जा सचिवांशी चर्चा फिसकटली, राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते येत्या सोमवारपासून संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 19:23 IST

केवळ संप करू नये म्हणून सोपस्कार पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने बैठक घेतली. त्यामुळे संघर्ष समिती व कृती समितीने प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला

सांगली : वीज विभागातील तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संघर्ष समिती, कंत्राटी कृती समिती आणि प्रधान ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे यांच्यात काल, शुक्रवारी झालेली ऑनलाईन बैठक निष्फळ ठरली. बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याने दि. २८ व २९ मार्चला राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते संपावर जाणार आहेत, अशी माहिती स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.भोयर म्हणाले, वीज कामगार, अभियंते, कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येऊन दीड महिन्यापूर्वी संपाची नोटीस दिली आहे. प्रशासनाने संपाच्या तीन दिवस अगोदर चर्चा करण्यास संघटनांना बोलविले होते. संघर्ष समिती व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या भावना मांडल्या. प्रशासनाने कोणताच धोरणात्मक निर्णय घेतला नाही.करू, पाहू, बघू, सल्ला घेऊ अशा पद्धतीची उत्तरे दिली. केवळ संप करू नये म्हणून सोपस्कार पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने बैठक घेतली. त्यामुळे संघर्ष समिती व कृती समितीने प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. २८ संघटना व कंत्राटी कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चेत ठोस निर्णय झाला नाही. लेखी करार झाला नाही. त्यामुळे दि. २८ व २९ मार्चचा संप होणार आहे.

शिस्तीचे पालन

दि. २७ मार्चच्या रात्री १२ नंतर दोन दिवसाचा संप सुरू होईल. सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी निदर्शने करतील. हा संप सर्वांनी शिस्तीत पार पाडावा, अशा सूचना आहेत. ऊर्जा उद्योगाच्या अस्तित्वाकरिता हा संप असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असे आवाहन भोयर यांनी केले आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

  • वीज कंपन्यांत सुरू करण्यात येत असलेले खासगीकरण धोरण रद्द करा.
  • महानिर्मिती कंपनी संचालित असलेली जलविद्युत केंद्रे खासगी उद्योगांना देण्याचे धोरण रद्द करा.
  • तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरणे व सूत्रधारी कंपनीचा वाढता हस्तक्षेप बंद करणे.
  • कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवून त्यांना ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित नोकरीत संरक्षण द्या
  • केंद्र सरकारचे नवीन वीज विधेयक रद्द करा.
टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजStrikeसंप