शहादा तालुक्यात वीज पडून ३७ मेंढ्या ठार

By Admin | Updated: June 26, 2016 02:46 IST2016-06-26T02:46:08+5:302016-06-26T02:46:08+5:30

शहादा तालुक्यातील जावदेतर्फे हवेली शिवारातील मेंढपाळ वस्तीवर अचानक वीज पडून ३७ मेंढ्या जागीच ठार झाल्या. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. चार मेंढपाळांना किरकोळ दुखापत झाली.

Electricity in Shahada taluka falls to 37 sheep | शहादा तालुक्यात वीज पडून ३७ मेंढ्या ठार

शहादा तालुक्यात वीज पडून ३७ मेंढ्या ठार

नंदुरबार : शहादा तालुक्यातील जावदेतर्फे हवेली शिवारातील मेंढपाळ वस्तीवर अचानक वीज पडून ३७ मेंढ्या जागीच ठार झाल्या. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. चार मेंढपाळांना किरकोळ दुखापत झाली. मेंढपाळांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंदाणे परिसरात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी सायंकाळी तुफान पर्जन्यवृष्टी झाली. जावदा शिवारातील मोकळ्या मैदानात मेंढपाळांनी मेंढ्यांचा पडाव टाकला होता. तेथेच अचानक वीज कोसळल्याने त्यात ३१ मेंढ्या व ६ शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity in Shahada taluka falls to 37 sheep