शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राज्यात वीज संकट गहिरे; लोडशेडिंग टाळण्यासाठी वाढीव दराने घ्यावी लागणार वीज, आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 05:29 IST

Electricity crisis deepens in Maharahtra; कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावरील विजेचे संकट गहिरे होत आहे. त्यामुळे आता पूर्वीच टाटा कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता राज्यमंत्री मंडळाची विशेष बैठक शुक्रवारी होणार आहे.

मुंबई - कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावरील विजेचे संकट गहिरे होत आहे. त्यामुळे आता पूर्वीच टाटा कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता राज्यमंत्री मंडळाची विशेष बैठक शुक्रवारी होणार आहे. राज्यावरील लोडशेडिंग  टाळण्यासाठी या बैठकीत आधीच्या करारापेक्षा वाढीव दराने वीज खरेदी करण्याबाबत राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत राज्यातील वीज टंचाईबाबत चर्चा झाली. विजेची मागणी वाढत असताना पुरेशी वीज उपलब्ध नसल्यामुळे लोडशेडिंगची परिस्थिती उद्भवली आहे. लगेच वीज खरेदी केली नाही तर राज्यभरात लोडशेडिंग करण्याशिवाय पर्याय नसेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सध्या २९ हजार मेगावॅट विजेची गरज आहे. पुरवठादेखील तेवढाच होत असला तरी ५०० मेगावॅट वीज कमी पडल्याने काही ठिकाणी लोडशेडिंग करण्यात आले होते. त्यामुळे काही प्रमाणात विजेचा तुटवडा आहे. राज्य सरकारने टाटा कंपनीच्या सीजीपीएल या मुंद्रा (गुजरात) येथील प्रकल्पाबाबत एक करार केला होता. त्यानुसार, साडेतीन रुपये प्रतियुनिट वीज मिळणार होती. मात्र, आता देशात कोळशाचा प्रचंड तुटवडा आहे. अशा परिस्थिती कंपनीला कोळसा आयात करावा लागत आहे. त्याचे दर अधिक आहेत. त्यामुळे सहा रुपये दराने वीज देण्यास कंपनीने अनुकूूलता दर्शविली आहे. मात्र, साडेतीन रुपयांऐवजी सहा रुपये दराने वीज खरेदी करण्याबाबतचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाला घ्यावा लागणार आहे. त्यासाठी शुक्रवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे.

गेल्या वर्षी वीज टंचाईच्या काळात राज्य सरकारला सोळा ते वीस रुपये दराने वीज खरेदी करावी लागली होती. आता खासगी क्षेत्रातील वीज बारा रुपयांहून अधिक दराने खरेदी करता येणार नाही, असा नवा नियम केंद्र सरकारने काढला आहे. त्यामुळे पूर्वीच्या कराराचा आधार घेत टाटांकडून वीज खरेदी करण्याचा पर्याय राज्यसरकार समोर आहे. त्या करारानुसार ७६० मेगावॅट वीज मिळणार आहे.

ऐन महागाईत वीज कडाडणारमागील दोन वर्षांपासून विजेच्या दरात आकारला जाणारा इंधन समायोजन आकार आता वेगळा आकारण्याची मुभा महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिली आहे. परिणामी बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरणच्या वीज दरात वाढ होणार असून, वाढत्या महागाईत वाढीव वीज दरामुळे आगीत तेल ओतले जाणार आहे. समायोजन आकारामुळे अदानीच्या ग्राहकांना प्रतियुनिट दहा ते वीस पैसे अधिक मोजावे लागतील.

तज्ज्ञ म्हणतात, जनसुनावणीची गरजगेली दोन वर्षे इंधन समायोजन आकाराचा वीज दरातच समावेश होता. तो वेगळा आकारला नव्हता. या आकारामुळे वीज कंपन्यांकडे जमा झालेला पैसा अधिक आहे. त्यामुळे वीज कंपन्यांना आकार वाढविण्याची जरुरी नाही. महावितरण या विषयावर काहीच बोलण्यास तयार नाही. याबाबत एक जनसुनावणी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अदानी म्हणतात, आमचे दर स्पर्धात्मक इंधन समायोजन आकाराबाबत अदानी, टाटा आणि महावितरणकडे विचार केली असता, महावितरण आणि टाटाकडून प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही, तर अदानीकडील माहितीनुसार, दीर्घकालीन नियोजन सुनिश्चित केले आहे. कोळसा पुरवठा आणि अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे वीजपुरवठा करताना आमचे दर स्पर्धात्मक राहतील.

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्रmahavitaranमहावितरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार