वीज कोसळून महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: June 8, 2015 01:35 IST2015-06-08T01:35:47+5:302015-06-08T01:35:47+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना : एक जखमी

वीज कोसळून महिलेचा मृत्यू
बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथे वीज अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. दरम्यान, मोताळा तालुक्यातील गोतमारा येथे झाड अंगावर पडून १८ बकर्या ठार झाल्या. रविवारी दुपारी अचानक आकाश भरून आले. तालुक्यातील गुम्मी येथे दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह प्रचंड वारा सुटला. वीज कोसळून महिलेचा मृत्यू यावेळी पूजा गणेश नरोटे (१८) आणि मंगला समाधान नरोटे या दोघी गुम्मी शेतशिवारात उभ्या होत्या. यावेळी वीज अंगावर कोसळून पूजा नरोटेचा मृत्यू झाला, तर मंगला नरोटे जखमी झाली. दरम्यान, दुपारनंतर अचानक वातावरण बदल होऊन रविवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडली. सागवण, कोलवड, चांडोळ, धाड, सुंदरखेड, भादोला, वरंवड, गुम्मी परिसरात जवळपास एक तास पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने बाजाराला आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली, तर लहान व्यावसायिकांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे. मोताळा व देऊळगावराजा तालुक्यातदेखील दुपारी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.