वीजबिल केंद्रे सुटीच्या दिवशीही चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:11 AM2018-03-29T03:11:13+5:302018-03-29T03:11:13+5:30

चालू तसेच थकित वीजबिलाचा भरणा ग्राहकांना करता यावा, याकरिता म्हणून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील सर्व

Electricity bills continue on the holidays | वीजबिल केंद्रे सुटीच्या दिवशीही चालू

वीजबिल केंद्रे सुटीच्या दिवशीही चालू

Next

मुंबई : चालू तसेच थकित वीजबिलाचा भरणा ग्राहकांना करता यावा, याकरिता म्हणून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २९ व ३० मार्च रोजी सुट्टीच्या दिवशीही सुरू आहेत. महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत असलेल्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील सुमारे १९५ हून अधिक वीजबिल भरणा केंद्रांचा यामध्ये समावेश राहणार आहे.
वीजग्राहकांकडून थकबाकी वसूलीसाठी ‘शून्य थकबाकी मोहीम’ सुरू आहे. वीजबिलांचा भरणा न केल्यास थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होत आहे. सुट्ट्या असल्या तरी महावितरणच्या ठाणे सर्कलअंतर्गत गडकरी, किसाननगर, कोपरी, पॉवर हाउस, विकास, कळवा, शिळ, मुंब्रा, वागळे इस्टेट, कोलशेत, लोकमान्यनगर, मुलुंड, नीलमनगर, पाच रस्ता, सर्वोदय, भांडुप, पन्नालाल, ईश्वरनगर या येथाल, तर वाशी सर्कलअंतर्गत वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, नेरुळ पामबीच, सीबीडी बेलापूर, पनवेल, भिंगरी, कळंबोली, उरण, खारगर ही वीजबिल केंद्रे सुरू आहेत.

Web Title: Electricity bills continue on the holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.