इलेक्ट्रीक शॉकने दोघा भावडांचा मृत्यू

By Admin | Updated: July 20, 2016 18:39 IST2016-07-20T18:39:10+5:302016-07-20T18:39:10+5:30

बकरीसाठी शेतात चारा घेण्यासाठी गेलेल्या दोघा भावांचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यावल-भालशीव रस्त्यावर बुधवारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली़.

Electric Shock dies two siblings | इलेक्ट्रीक शॉकने दोघा भावडांचा मृत्यू

इलेक्ट्रीक शॉकने दोघा भावडांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
यावल, दि.20 -  बकरीसाठी शेतात चारा घेण्यासाठी गेलेल्या दोघा भावांचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यावल-भालशीव रस्त्यावर बुधवारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली़.  
विकी रमेश भील (२६) व कृष्णा रमेश भील (२२) असे मयत भावंडांची नावे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार यावल-भालशीव रस्त्यावरील किरंगे नामक शेतकऱ्याच्या शेतात बकरीसाठी चारा आणावयास यावलचे गुराखी भावंडे गेले असता शेतातून गेलेली वीज वाहक तार तुटल्याने तिचा धक्का लागून दोघा भावंडांचा जागीच करुण अंत झाला तर दोघांना सोडण्यासाठी गेलेले तिघेही जखमी झाले.  हे दृश्य पाहून मानसिक धक्का बसल्याने प्रकाश रमेश भील (२४), दिलीप अण्णा भील (२५) व घनश्याम रमेश भील (२८) हे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Electric Shock dies two siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.