तासगावात निवडणूक होणारच !
By Admin | Updated: March 28, 2015 01:59 IST2015-03-28T01:59:29+5:302015-03-28T01:59:29+5:30
राज्याचे लक्ष लागलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले.

तासगावात निवडणूक होणारच !
सांगली : राज्याचे लक्ष लागलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. राष्ट्रवादीच्या उमेदवार, दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याविरोधात आठ अपक्ष रिंगणात असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
उमेदवार रिंगणात असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमनताई पाटील यांना भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांचे आव्हान असणार आहे.