शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण रद्द झालेल्या वाॅर्डांत १८ जानेवारीला निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 05:53 IST

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील  ओबीसींच्या राखीव जागा न्यायालयाच्या आदेशानुसार खुल्या करण्याचा निर्णय घेत तिथे १८ जानेवारीला निवडणूक होईल, ...

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील  ओबीसींच्या राखीव जागा न्यायालयाच्या आदेशानुसार खुल्या करण्याचा निर्णय घेत तिथे १८ जानेवारीला निवडणूक होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी घोषित केले. अन्य जागांसाठीची निवडणूक आधी जाहीर केल्याप्रमाणे २१ डिसेंबरला होईल. या निर्णयामुळे राज्यातील सरकारला धक्का बसला आहे. निवडणूक ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत पुढे ढकला, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारच्या वतीने आयोगास देण्यात आले. मात्र, तोवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

१०६ नगरपंचायतींमधील ३४४ जागा, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेतील २३ जागा, त्या अंतर्गतच्या १५ पंचायत समित्यांमधील ४५ जागा, चार महापालिका वॉर्डांपैकी एका जागेवर (सांगली) १८ जानेवारीला निवडणूक होईल. या शिवाय, ४५५४ ग्रामपंचायतींमधील ७१३० एकूण पदांपैकी अनारक्षित ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गात १८ जानेवारीलाच निवडणूक होईल. चार महापालिका जागांपैकी ज्या तीन जागांवर (धुळे, अहमदनगर, नांदेडमधील प्रत्येकी एक) २१ डिसेंबरला मतदान तर मतमोजणी मात्र २२ डिसेंबरला होईल.

मतमोजणी होणार १९ जानेवारीला२१ डिसेंबर आणि १८ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारीला होईल. निवडणूक आयोगाने ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागा खुल्या प्रवर्गात आणून त्यात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. महिला आरक्षणाची सोडत त्या-त्या ठिकाणी होईल अन्  त्यानुसारच १८ जानेवारीला निवडणूक होईल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रOBC Reservationओबीसी आरक्षण