महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच - जे. एस. सहारिया
By Admin | Updated: January 8, 2017 13:58 IST2017-01-08T13:58:02+5:302017-01-08T13:58:02+5:30
राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्यातच होतील अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी

महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच - जे. एस. सहारिया
ऑनलाइन लोकमत
मुंबई : राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्यातच होतील अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली आहे.
मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा असल्याने निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलं. निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली असून महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत तसेच काही दिवसांमद्ये याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचं ते म्हणाले.
राज्यात मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर या शहरांत महापालिका निवडणुका होणार आहे.