ELECTION RESULT-पंकजा मुंडेंचा राजीनामा स्वीकारणार नाही - मुख्यमंत्री

By Admin | Updated: February 23, 2017 20:20 IST2017-02-23T19:26:27+5:302017-02-23T20:20:07+5:30

पंकजा मुंडेंचा राजीनामा मिळाला तरी तो स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

ELECTION RESULT - Pankaja Munda will not accept resignation - CM | ELECTION RESULT-पंकजा मुंडेंचा राजीनामा स्वीकारणार नाही - मुख्यमंत्री

ELECTION RESULT-पंकजा मुंडेंचा राजीनामा स्वीकारणार नाही - मुख्यमंत्री

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 -  बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारुन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र पंकजा मुंडेंचा राजीनामा मिळाला तरी तो स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.  
 
मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 
दुसरीकडे, परळीत विजय मिळवलेले धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना ट्विटवर टोला हाणला आहे. 'पराभवामुळे कोणी राजीनामा द्यावा की न द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सत्ता,पैसा असूनही पराभव का झाला याचे आत्मचिंतन मात्र नक्की करावे',असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. 
 
परळीमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. येथे भाजपाला एकही जागा मिळाली नाही. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पंकजा मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचे सांगितले होते. 
 

Web Title: ELECTION RESULT - Pankaja Munda will not accept resignation - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.