ELECTION RESULT-सिनेमा पडला म्हणून अमिताभ फ्लॉप ठरत नाही - सुप्रिया सुळे
By Admin | Updated: February 23, 2017 20:20 IST2017-02-23T19:14:34+5:302017-02-23T20:20:31+5:30
राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची यंदाच्या निकालात कधी नव्हे इतकी पिछेहाट झाली.

ELECTION RESULT-सिनेमा पडला म्हणून अमिताभ फ्लॉप ठरत नाही - सुप्रिया सुळे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची यंदाच्या निकालात कधी नव्हे इतकी पिछेहाट झाली. त्यावर एक सिनेमा पडला म्हणून अमिताभ बच्चन फ्लॉप अभिनेता ठरत नाहीत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. एबीपी माझा सोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
निवडणुकांमध्ये अपयश आलं हे मान्य करत सुप्रिया यांनी पराभव मान्य केला पण हा दारूण पराभव नसल्याचं त्या म्हणाल्या. निवडणुकीतील आमची कामगिरी 2014 च्या लोकसभेपेक्षा चांगली होती अशी सारवासारव त्यांनी केली. निवडणूक हारल्यामुळे सर्व काही संपत नाही, एक सिनेमा पडला म्हणून अमिताभ बच्चन फ्लॉप अभिनेता ठरत नाही असं त्या म्हणाल्या.
भाजपाला इनकमिंग फ्री असल्याचा फायदा झाला. त्यांनी जाहिरातींसाठी केलेला अफाट खर्च, मीडियावरचा खर्च, आयात केलेल कार्यकर्ते याचा फायदा भाजपाला झाला. मात्र, पराभवाने खचून जाण्याची गरज नाही, आमचं पक्षसंघटन कमी पडलं. पक्षसंघटनेवर काम करण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या.