शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिका महापौरपदी भाजपाच्या डिंपल मेहता विजयी; तर चंद्रकांत वैती उपमहापौरपदी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 14:13 IST

निवडणुकीत महापौरपदी अपेक्षेप्रमाणे भाजपच्या डिंपल मेहता विजयी झाल्या आहेत.

ठळक मुद्देमीरा भाईंदर महापालिका महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी सकाळी सुरू झाली आहे.  मीरा भाईंदर महापालिका महापौरपदी भाजपाच्या डिंपल मेहता विजयी झाल्या आहेत.शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा केला पराभव.

भाईंदर, दि. 28 - मीरा भाईंदर महापालिका महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी सकाळी सुरू झाली. या निवडणुकीत              महापौरपदी अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या डिंपल मेहता विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा पराभव करत डिंपल मेहता यांनी विजय मिळवला. डिंपल मेहता यांना  61 मतं मिळाली तर अनिता पाटील यांना  34  मतं मिळाली. महापौरपदासाठीच्या शिवसेनेच्या उमेदवार अनिता पाटील यांना काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी सुद्धा मतदान केलं. काँग्रेस पुरस्कृत 2 अपक्ष नगरसेवकांनीदेखील सेनेच्या अनिता पाटील यांना मतदान केलं.

महापौर पदाच्या या निवडणुकीसाठी भाजपाचे 61 नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात उपस्थित झाले होते. तर शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक एकत्र सभागृहात दाखल झाले. भाजपाकडून डिंपल मेहता या महापौरपदासाठीच्या उमेदवार होत्या तर शिवसेनेकडून अनिता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेत महापौरपदासाठी भाजपा विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत बघायला मिळली. निवडणूक प्रक्रियेपूर्वी भाजपाकडून वंदना भावसार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. 

तर मीरा भाईंदर महापालिका उपमहापौर पदी अपेक्षे प्रमाणे भाजपचे चंद्रकांत वैती विजयी झाले. काँग्रेसच्या अनिल सावंत यांचा त्यांनी पराभव केला. चंद्रकांत वैती यांना  61   मतं मिळाली तर सावंत यांना  34  मतं मिळाली. सावंत यांना शिवसेनेच्या 22 नगरसेवकांनीसुद्धा मतदान केले. काँग्रेस पुरस्कृत 2 अपक्ष नगरसेवकांन देखील सावंत यांना मतदान केले. वैती हे माजी उपमहापौर तसेच माजी विरोधी पक्षनेते होते.

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता राखली. बहुमताचा आकडा पार करत भाजपने 61 जागांवर विक्रमी आघाडी घेतली आहे.  भाजपाच्या लाटेनं इतर पक्षांचा सुपडा साफ केला   शिवसेना 22, काँग्रेस 10 आणि इतरांना 2 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.  मीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत भाजपाच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर शिवसेनेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली असून तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला यावर्षी चांगले यश मिळाले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनाला 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सत्तेचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सेनेच्या जागेत वाढ झाली आहे. अतिम निकाल हाती आला असून सेनेच्या वाट्याला 22 जागा मिळाल्या आहेत. 

गेल्या निवडणुकीत मिरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर होती. राष्ट्रवादीकडे भाजपखालोखाल 27 जागा होत्या. पण यावेळी राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. एकही जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची मोठा धक्का बसला आहे.  मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत काँग्रेसला 9 जागांच नुकसान झाले आहे.  गेल्यावर्षी काँग्रेसच्या  वाट्याला 19 जागा आल्या होत्या. मात्र, यावेळी काँग्रेसच्या 10 जागांवर समाधान मानावं लागले आहे.  शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसच्या एका जागेवर बिनविरोध जिंकली. अल्पसंख्याक मतांवर मदार असलेल्या काँग्रेसला यावेळी मतदारांनी हात दाखवलाय.

मीरा भाईंदर महापालिकेच्या 2012च्या निवडणुकीत भाजपानंच सर्वाधिक 32 जागा मिळवल्या होत्या, मात्र त्याच वेळी काँग्रेसनं 18 आणि राष्ट्रवादीनं 26 जागा मिळवून अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली होती. पहिल्या अडीच वर्षात  काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, अपक्षांची सत्ता होती. मात्र त्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भाजपानं सत्ता खेचून आणली होती. नंतरच्या अडीच वर्षात भाजपा, शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी बहुजन विकास आघाडी, अपक्षांची मोट बांधत सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावे लागले होते. भाईंदर महापालिकेच्या 2012च्या महापालिका निवडणुकीत भाजपा 32, शिवसेना 15, काँग्रेस 18,  राष्ट्रवादी 26, बहुजन विकास आघाडी 3, एका अपक्षाचा विजय झाला होता. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक