पोलादपूरमध्ये निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: October 16, 2014 05:07 IST2014-10-16T05:07:30+5:302014-10-16T05:07:30+5:30
महाड विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेले निवडणूक यंत्रणा कर्मचारी नथुराम भिसे (३०) यांचा बुधवारी निवडणुकीच्या कामासाठी जात असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला

पोलादपूरमध्ये निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू
अलिबाग : महाड विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेले निवडणूक यंत्रणा कर्मचारी नथुराम भिसे (३०) यांचा बुधवारी निवडणुकीच्या कामासाठी जात असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ‘संजय गांधी योजने’त लिपिक असलेले भिसे महाड विधानसभा मतदारसंघ, निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जात होते.
रस्त्यातच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. भिसे हे निवडणूक यंत्रणा कर्तव्यावर असताना त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची आर्थिक मिळणे अपेक्षित असल्यामुळे त्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना तत्काळ प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर तात्काळ कार्यवाही करत त्यांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्याक आली आहे. त्यानुसार कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती भांगे यांनी दिली. (प्रतिनिधी)