कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारीला

By Admin | Updated: January 7, 2017 05:44 IST2017-01-07T05:44:10+5:302017-01-07T05:44:10+5:30

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला

Election of Konkan Divisional Teachers' Constituency on 3rd February | कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारीला

कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारीला


नवी मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, ३ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कोकण विभागातील पाच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून, आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, समिती सभागृह, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन, सीबीडी, बेलापूर, हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तसेच उपायुक्त (सामान्य), कोकण विभाग हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील ५ जिल्ह्यांमध्ये ४ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कोकण विभाग मतदार संघामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. मतदार यादीनुसार कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ठाणे-१५७३६, पालघर-५११५, रायगड-१०००९, रत्नागिरी-४३२८, सिंधुदुर्ग-२४५६ असे एकूण ३७६४४ मतदार आहेत. भारत निवडणूक आयोगाकडील कार्यक्र मानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक ७ जानेवारी रोजी होणार आहे. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रशांत बुरु डे, उपायुक्त (सामान्य) शिवाजी कादबाने उपस्थित होते.
एकूण मतदान केंद्र
मतदार संघातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ९८ मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. ठाणे जिल्ह्यात २१, पालघर जिल्ह्यात १३, रायगड जिल्ह्यात २८, रत्नागिरी जिल्ह्यात १७ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ असे आहेत.
>असा आहे
निवडणूक कार्यक्र म
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्धीचा दिनांक मंगळवार, १० जानेवारी, २०१७, नामनिर्देशन सादर करण्याचा अखेरचा मंगळवार, १७ जानेवारी
नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार, १८ जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार, २० जानेवारी
मतदान शुक्रवार, ३ फेब्रुवारी
मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी सोमवार, ६ फेब्रुवारी
निवडणूक प्रक्रि या पूर्ण करण्याचा गुरुवार, ९ फेब्रुवारी
>या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. नवीन शस्त्र परवाना न देणे, मागच्या निवडणुकीच्या वेळी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. अवैध शस्त्र, दारू जप्त करण्याकरिता मोहिमा राबविल्या जाणार आहेत.
- प्रशांत बुरु डे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र.

Web Title: Election of Konkan Divisional Teachers' Constituency on 3rd February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.