शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड लांबणीवर? स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्याकडून सदस्य निवडीला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 20:40 IST

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर होणार एकत्रित सुनावणी

राजू इनामदारपुणे: लोकनियुक्त आमदारांनी विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या जागांचा वाद संपुष्टात आल्यावर आता राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीचा विषय पुढे येत आहे. या निवडीला आव्हान देणार्या याचिका राज्यातील काही न्यायालयांमध्ये प्रलंबित असून त्याची एकत्रित सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या जागांवर असणार्या विद्यमान सदस्यांची मुदत संपली असली तरी नव्या सदस्यांची निवड होण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत.सन २०१४ मध्ये या वर्गातून निवड झालेल्या बहुसंख्य सदस्यांची मुदत संपली आहे. काही जणांची मुदत जून अखेरीस पुर्ण होत आहे. जोगेंद्र कवाडे, विद्या चव्हाण, संजय पाटील, अनंत गाडगीळ व अन्य काही अशा १२ जणांची त्यावेळी निवड झाली होती. चारपाच दिवसांच्या अंतराने त्यांंनी शपथ घेतली होती. सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असल्याने त्यांनी प्रत्येकी ६ याप्रमाणे १२ जणांची निवड केली होती.या सर्वच निवडींना काही स्वयंसेवी संस्था, संघटना यांंनी याचिका दाखल करून न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांची अंतिम सुनावणीच अद्याप झालेली नाही. सर्व याचिका एकत्र करून आता ही सुनावणी होणार आहे. त्यामुळेच नव्या सदस्यांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.त्यातूनच जून्या १२ सदस्यांची मुदत संपली असली तरी त्यांना वाढीव मुदत मिळण्याची चिन्ह आहेत.या न्यायालयीन गोष्टी बरोबरच कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी पावसाळी अधिवेशनही पुढे ढकलण्याची चर्चा सुरू आहे. अधिवेशन घेतले तरी ते दोनच दिवसात संपवावे अशीही मागणी काही आमदार करत आहेत. त्यामुळेही विधानपरिषदेवरील या १२ नियुक्त्या लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे.राज्यपालांकडून कला साहित्य विज्ञान सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात ऊल्लेखनीय योगदान देणार्या सदस्यांची निवड विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात येते. त्या त्या क्षेत्रात संबधित व्यक्तींच्या अनूभवाचा लाभ राज्याला व्हावा या हेतूने घटनेतच ही तरतूद करण्यात आली आहे. या नावांची सुचना राज्यपालांकडे सरकार करत असते व राज्यपाल ती मान्य करतात. दरवेळी सत्ताधारी पक्ष या जागांवर राजकीय असंतुष्टांची वर्णी लावत असतो. विरोधी पक्षांना त्यात स्थान दिले जात नाही. घटनेतील तरतुदीचे पालन केले असे दाखवण्यासाठी काही सामाजिक, सांस्कृतिक संस्थामध्ये निवड करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच सभासद म्हणून दाखवले जाते. त्यामुळेच काहीजणांनी या निवडीला आव्हान दिले आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी