शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 18:42 IST

Election Commission on NCP : निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली असून, सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.

Election Commission on NCP : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली अन् पक्षावर दावा केला. याप्रकरणी आज निवडणूक आयोगात पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी झाली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले होते. निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली असून, सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.

वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी अजित पवारांची बाजू मांडली, तर वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू लावून धरली. सुनावणीदरम्यान, दोन्ही गटाकडून विविध कागदपत्रे सादर करण्यात आली. यावेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनुसिंघवींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचा दाखला दिला. 

अभिषेक मनुसिंघवींचा मोठा आरोपअजित पवार गटाकडून 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. पण, अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत. खोटी कागदपत्रे सादर करून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा शरद पवारच आहेत, असं वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.

जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीरजयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी केला. तसेच सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असा दावा केला. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आणि लोकप्रतिनिधींचे संख्याबळ महत्त्वाचे आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केला.

शरद पवारांची पक्षात मनमानीशरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा दावा अजित पवार गटाने यावेळी केला. एका सहीवर कुणाची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. महाराष्ट्रातील 53 आमदारांपैकी 43 आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच विधान परिषदेच्या 9 पैकी 6 आमदार आमच्यासोबत आहे. लोकसभेचे एक आणि राज्यसभेचा एक खासदार आमच्यासोबत आहे, अशी माहितीही अजित पवार गटाने दिली.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग