शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:04 IST

Maharashtra Assembly Election 2024, ECI Press Conference: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या संपूर्ण टीमने दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

Maharashtra Assembly Election 2024, ECI Press Conference: निवडणूक आयोगाच्या टीमने महाराष्ट्रातील प्रस्तावित विधानसभा निवडणुकीबाबत राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. राजीव कुमार यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीची तयारी कशी केली जात आहे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. 'आपले मत आपला हक्क' हा निवडणूक कार्यक्रम राज्यात राबविला जाणार आहे. तसेच, निवडणुका कधी घेतल्या जाणार, याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

कधी होणार निवडणुका?

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १,००, १८६ मतदान केंद्रे असतील. मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्र लोकशाहीच्या उत्सवात चांगले योगदान देईल. दोन दिवस आम्ही राज्यातील राजकीय पक्षांशी चर्चा केली. आगामी सण आणि उत्सवाच्या नंतर निवडणुका जाहीर कराव्यात असे राजकीय पक्षांचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने या दौऱ्यात बसपा, आप, सीपीआय, मनसे, शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी यांच्यासहित ११ पक्षांची भेट घेतली आणि त्यांची मते जाणून घेतली. निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सणांची काळजी घ्यावी, असे सर्वांनी मिळून सांगितल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील असे स्पष्ट झाले आहे.

विविध पक्षांच्या मागण्या

काही पक्षांनी पैशाच्या ताकदीवर अंकुश ठेवण्याचीही विनंती केली. तर काहींनी मतदान केंद्र दूर असल्याने वृद्धांसाठी वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली. निवडणुकीची तारीख सोयीची असावी, अशीही पक्षांची मागणी आहे. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत काही गैरसोयी दिसल्या, मतदारांना पुन्हा असे अनुभव येऊ नयेत. तसेच फेक न्यूजच्या प्रसारावर बंदी घालावी. काही पक्षांनी पोलिंग एजंट एकाच मतदारसंघातील असावा, अशीही विनंती केली. तर मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणीही काही पक्षांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024