ज्येष्ठांचा परदेश प्रवास होणार सुलभ

By Admin | Updated: August 17, 2016 01:16 IST2016-08-17T01:16:40+5:302016-08-17T01:16:40+5:30

ज्येष्ठ नागरिकांना पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या कामासाठी आता पोलीस ठाण्यात जाण्याची अजिबात गरज नाही़ पोलीस कर्मचारी अथवा उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागरिकांच्या

Elderly people can travel abroad | ज्येष्ठांचा परदेश प्रवास होणार सुलभ

ज्येष्ठांचा परदेश प्रवास होणार सुलभ

पुणे : ज्येष्ठ नागरिकांना पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या कामासाठी आता पोलीस ठाण्यात जाण्याची अजिबात गरज नाही़ पोलीस कर्मचारी अथवा उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करावे, असा आदेश दिला असल्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले़ त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या १०९० या हेल्पलाईनचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या़ या कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अपर पोलीस आयुक्त सी़ एच़ वाकडे, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक डॉ़ पी़ के़ होता, पोलीस उपायुक्त पी़ आऱ पाटील, सहायक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आदी उपस्थित होते़
पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट कार्यालयात फॉर्म भरल्यानंतर सबंधित व्यक्तीचे स्थानिक पोलिसांकडून व्हेरिफिकेशन केले जाते. संबंधित व्यक्ती नमूद पत्त्यावर राहावयास आहे की नाही, राहावयास असल्यास किती दिवसापासून, यासह इतर माहितीची खातरजमा करून घेण्यासाठी ही पडताळणी केली जाते. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना व्हेरिफिकेशनच्या कामासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत.
रश्मी शुक्ला म्हणाल्या, की शहरातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा ह ेआमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे़ शहर पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली असून, त्यांना ओळखपत्र देण्याचेदेखील काम सुरू करण्यात आले आहे. शहरात जवळपास ५ ते ६ लाख ज्येष्ठ नागरिक असल्याचे निदर्शनास आले आहे़ पण, त्यांपैकी खूपच थोड्यांची नोंदणी आमच्याकडे झाली आहे़ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केल्यास त्या-त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आपल्या भागातील नागरिकांना कशा प्रकारची सुरक्षा देता येईल, हे ठरविणे सोपे जाईल़ प्रत्येक पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या इतर अडचणी व समस्या १०९० या हेल्पलाईनवर सांगाव्यात़ याशिवाय, पुणे पोलिसांच्या वेबसाईट, टिष्ट्वटर, फेसबुकवरही ते आपल्या समस्या व सूचना देऊ शकतील़
कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक शरदचंद्र साठे यांनी १०९० या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तो स्वीकारून हेल्पलाईनचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन केले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी.आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांनी आभार मानले़ ज्येष्ठ नागरिक कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Elderly people can travel abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.