पुणो : दहा वर्षापूर्वी वयाची साठी उलटलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा संधिवात हा आजार आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. गेल्या 5 वर्षात तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. पाठदुखी, सांधे दुखणो, हाडांचा ठिसूळपणा, आमवात अशा संधिवाताच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या तरुणांच्या रांगा डॉक्टरांकडे लागत आहेत. सतत वातानुकूलित कार्यालयांमध्ये (एसी) काम करणो, व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली आदी गोष्टी यांसाठी कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
स्नायूंचे दुखणो, हाडांच्या जॉईंटमध्ये दुखणो, गुडघेदुखी, हाडांचा ठिसूळपणा, पाठदुखी, आमवात आदी आजार हे संधिवाताचे विविध प्रकार आहेत. साठीनंतरचा हा आजार वयाची चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्येही दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर वयाच्या तिशीनंतरही या आजाराचे काही प्रकार तरुणांमध्ये वेगाने वाढत आहेत.
याबाबत ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती म्हणाले, ‘देशात 6 ते 7 टक्के लोकांना संधिवाताचा आजार जडला आहे. पुण्यातील 25 ते 3क् टक्के लोकांना पाठदुखीशी संबंधित संधिवाताचा आजार असल्याचे दिसून येत आहे, यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पुण्यातील बहुतांशी तरुण आयटी क्षेत्रत कामास असल्याने ते दिवसभर एसीमध्ये बैठे काम करतात, त्यामुळे त्यांच्या अंगावर सूर्यकिरणो पडत नाहीत, त्यामुळे जीवनसत्त्व ‘ब’ची कमतरता वाढत आहे. त्यातून हाडे ठिसूळ होत आहेत. याचबरोबर व्यायामाचा अभाव, बदलती दिनचर्या ही कारणोही संधिवातासाठी कारणीभूत आहेत. हाडांचे जॉईंट जिथे आहेत तेथे दुखण्याचा आमवातही वाढत आहे, तर संधिवात कधीही होण्याचे प्रमाण वाढत आहे. यातही गुडघेदुखीच्या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आणि देशात आहेत. सतत एसीमध्ये काम केल्यामुळे स्नायू आखडतात आणि सततच्या बैठय़ा कामामुळे पाठदुखी वाढत आहे.
रजोनिवृत्तीच्या टप्प्यात असलेल्या महिलांमध्ये कॅल्शिअमची कमतरता होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण अधिक आहे, असेही डॉ. संचेती यांनी सांगितले.
ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मदन हार्डीकर म्हणाले, ‘पुण्यात गुडघेदुखीच्या आजारात 2क् टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने थंडीच्या काळात आणि ढगाळ हवामानात संधिवात आजार आपले डोके वर काढतो. ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, एसीमध्ये सतत बसून काम करणो, आहाराच्या बदललेल्या सवयी या गोष्टी संधिवात वाढण्यास कारणीभूत आहेत. पूर्वी वयाच्या 5क्-6क् नंतर दिसून येणारा हा आजार आता चाळीशीनंतर दिसून येत आहे.’
बैठे काम, खराब रस्ते पाठदुखीस कारणीभूत
पुण्यातील तरुणांमध्ये पाठीच्या संधिवाताचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सतत एसी कार्यालयात बसून काम करणो आणि खराब रस्त्यांवर दुचाकीवरून दररोज प्रवास करणो हे पाठदुखीच्या आजाराला निमंत्रण देते.
- डॉ. के. एच. संचेती,
ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ
पुण्यातील 2क् टक्के नागरिक गुडघेदुखीने त्रस्त
पुण्यात संधिवाताचे प्रमाण वेगाने वाढत आहे. शहरातील 2क् टक्के नागरिक गुडघ्याच्या संधिवाताने त्रस्त आहेत. प्रामुख्याने थंडीच्या काळात आणि ढगाळ हवामानात संधिवात आजार डोके वर काढतो. त्याचा रुग्णांना खूप त्रस होतो.
- डॉ. मदन हार्डीकर,
ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ