शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: माझ्याकडे असे कलाकार, तुम्हाला कळणारही नाही...; एकनाथ शिंदेंचा आता थेटच इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:04 IST

Eknath Shinde's Latest Speech: मुख्यमंत्रिपदासाठी मी गेलोच नव्हतो. खूप लोकांनी सांगितलं असे करा, तसे करा, मात्र आम्ही सावध राहिलो. आजचा मतदार खूप हुशार आहे. मी त्यांना एकदा नाही तर पाचवेळा समजावले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे गटात फूट पडावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत. देवीने कुणाचा बळी घेतला? आता देखील काहीही बडबडत आहेत. माझ्या सोबत आलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असे म्हणत आहेत. मी म्हणतो, यातील एकही पराभूत होणार नाही. एकजरी पराभूत झाला तरी हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून जाईल, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना दिले आहे. 

माझे भाषण पंतप्रधानांनी पूर्ण पाहिले. मी मनापासून बोलत होतो, म्हणून पाहिल्याचे ते म्हणाले. मी किती काळ आहे हे ठरवणारे तुम्ही कोण? याची चिंता जनता करेल. कोर्टाने पळवून लावलेय. जिंकलो आम्ही आणि फटाके ते वाजवत आहेत, हसावं की रडावं हेच कळत नाहीय, असा टोला शिंदे यांनी लगावला. 

तुमच्या मतदारसंघात एकही काम शिल्लक राहणार नाही. थोडीफार कामं शिल्लक ठेवा, नाहीतर  लोकं नंतर विसरतील. मुख्यमंत्रिपदासाठी मी गेलोच नव्हतो. खूप लोकांनी सांगितलं असे करा, तसे करा, मात्र आम्ही सावध राहिलो. आजचा मतदार खूप हुशार आहे. मी त्यांना एकदा नाही तर पाचवेळा समजावले होते. मग शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. माझ्याकडे अधिकार नव्हते, पण मी शिवसेनेच्या लोकांना वेळ द्यायचो, ऐकून घ्यायचो. थोडा निधी द्यायला लागलो, तर ते देखील या लोकांना पहावले नाही, असेही शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेवर शंभरपेक्षा जास्त केसेस आहेत. वयाच्या एकवीसाव्या वर्षी मी चाळीस दिवस जेलमध्ये होतो. आमच्या बापांची नावं घेतली. माझ्या मुलांकडेही वेळ देता आला नाही. माझ्या परिवाराने मला साथ दिली. प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी दिला म्हणून शिवसेना मोठी झाली. याच लोकांना बाळासाहेबांना मोठं केलं आणि याच लोकांनी बाळासाहेबांची शिवसेना मोठी केली. मला कोणताही फोडाफोडी करायची नाहीय. पण मी असाच बसणार नाहीय. माझ्याकडे अनेक पर्याय आहेत. माझ्याकडे असे अनेक कलाकार आहेत, त्यांची कलाकारी तुम्हाला कळणारही नाही, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना