शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha: "एकनाथ शिंदेजी, ...तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल’’, भास्कर जाधवांचं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 13:51 IST

Maharashtra Vidhan Sabha: विधानसभेत आज सादर झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासमत प्रस्तावामध्ये सरकारने बहुमत मिळवलं आहे. यावेळी शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषण करत शिंदे गट आणि भाजपा यांच्या आघाडीवर खोचक शब्दांमध्ये जोरदार टीका केली.

मुंबई - विधानसभेत आज सादर झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासमत प्रस्तावामध्ये सरकारने बहुमत मिळवलं आहे. त्यानंतर सरकारच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषण करत शिंदे गट आणि भाजपा यांच्या आघाडीवर खोचक शब्दांमध्ये जोरदार टीका केली. तसेच भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केले आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. पण आपल्या फारशा भेटीगाठी झाल्या नाहीत. तसेच फारशी बोलचालही झाली नाही. मात्र गतवर्षी कोकणात आलेल्या पुरामध्ये तुम्ही मोलाचं काम केलं हे मी मान्य करतो. पण आता कोण कोणाविरोधात लढणार आहे. तर आमदार विरोधात गेलेत आणि शिवसैनिक छातीचा कोट करून खंबीरपणे लढताहेत. महाराष्ट्रात महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे, अशी भीती भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपा हा तुमचा वापर शिवसेनेविरोधात करून घेत आहे, असं सांगत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केलं. ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तुम्हाला भाजपावाले लढवताहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असे वाद लावून लढवताहेत. मात्र यामध्ये रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल. यात घायाळ होतील ते शिवसैनिक होतील. संपेल ती शिवसेना संपेल. भाजपाचा २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर तो शिवसेनेला संपण्याचा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्याबद्दल यांना काहीही प्रेम आलेलं नाही. याची मी अनेक उदाहरणं मी सांगू शकेन. तुम्ही मुख्यमंत्री झालात, याबाबत मी आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी दोन पावलं माघारी या, असं मी तुम्हाला आवाहन करतो.  एकनाथरावजी, तुम्ही  शिवसेना फुटू दिली नाही. फुटीपासून वाचवली तर हा संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, असं भावनिक आवाहनही भास्कर जाधव यांनी यावेळी केलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा