शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘मुख्यमंत्री व्हायचे का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना केला होता’; आदित्य ठाकरे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 08:27 IST

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेतृत्वाकडून सध्या मुंबईत विविध मेळावे घेतले जात आहेत.

मुंबई : महिनाभरापूर्वीपासूनच कुरबूर सुरू होती. तेव्हा २० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावून घेत तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा थेट प्रश्न केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी इतर मुद्दे मांडत मूळ प्रश्नाला बगल दिली, असा आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेतृत्वाकडून सध्या मुंबईत विविध मेळावे घेतले जात आहेत. कलिना येथे शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा थेट प्रश्न विचारल्यावर प्रश्न टाळत निधी मिळत नाही, आमदारांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा आहे, ही फाईल उघडली आहे-ती फाईल उघडली आहे, अशी भाषा त्यांनी केली. नाटक केले, रडगाणे झाले. पण या २० जूनला व्हायचे होते ते झालेच. तरीही तिथले १५ ते २० लोक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. 

विजय हा शिवसेनेचाच --  आमचाच गट अधिकृत, आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना, ही नावे लावण्याची तुमची लायकी असती तर तुम्ही बंड करायला सुरतला पळाला नसता. - बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे भक्त असते तर त्यांनी समोर येऊन सांगितले असते की मला मुख्यमंत्री बनवा. महाराष्ट्रात लपून बसायची हिंमत नाही, म्हणून गुवाहाटीला पळाले, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला. - विरोधी पक्षात बसण्यासाठी केलेले हे देशातील पहिलेच बंड असेल. पण ते विधानसभेत येणार नाहीत, याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत. आकड्यांचा खेळ आता कसाही दिसत असला तरी सभागृहात विजय हा शिवसेनेचाच होईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे