शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: शिवसेनेचे नगरसेवक कुणाकडे? शिंदे की ठाकरे? समोर येतेय अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:03 IST

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उलथापालथ सुरू झाली असताना राज्यातील २७ महापालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांची काय भूमिका आहे, ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहणार की शिंदेंच्या गटात जाणार याचा ‘लोकमत’च्या चमूने घेतलेला हा आढावा.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उलथापालथ सुरू झाली असताना राज्यातील  २७ महापालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांची काय भूमिका आहे, ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहणार की शिंदेंच्या गटात जाणार याचा ‘लोकमत’च्या चमूने घेतलेला हा आढावा. 

५३२ नगरसेवकांचा कल  राज्यातील २७ महापालिकांमध्ये शिवसेनेचे एकूण ५३२ नगरसेवक आहेत. सांगली, पनवेल आणि लातूर या महापालिकांमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. या नगरसेवकांनी अजूनही थेटपणे आपले पत्ते उघडलेले नाहीत.  

मुंबई/कोकण मुंबई ९७भूमिका : आजमितीस तरी सर्व नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आहेत. आम्ही आमच्या नगरसेवकांच्या आणि विभाग स्तरावर बैठका घेत असून एकही नगरसेवक फुटणार नाही, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

नवी मुंबई  ४७ भूमिका : आता प्रशासक असल्याने सर्व माजी नगरसेवक आहेत. शिंदे यांच्या समर्थकांनी नगरसेवकांची जुळवाजुळव ही सुरू केली असून २८ ते ३० नगरसेवक बंडखोर शिंदे यांच्या बाजूला झुकलेले आहेत. 

 ठाणे ६७भूमिका : सर्वच्या सर्व ६७ नगरसेवक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. शिंदे यांनी अजूनही शिवसेना सोडलेली नाही आणि आम्हीही शिवसेनेत आहोत. आमचे समर्थन शिंदे यांनाच आहे, असे नगरसेवक सांगतात. 

 उल्हासनगर २५ (दोघांचे निधन)भूमिका : सध्या शिवसेनेतील बहुतांश नगरसेवक संभ्रमित आहेत. तर माजी महापौर लीलाबाई अशान व बहेनवाल यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी शिवसेनेत राहत असल्याचे सांगितले. 

पनवेल ०भूमिका : पनवेल महापालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही.  

 मीरा-भाईंदर२२ भूमिका : एका नगरसेवकाचे निधन झाले असून २ नगरसेविका भाजपच्या गोटात आहेत. तर १९ नगरसेवक सध्या सेनेसोबत आहेत.

 कल्याण-डोंबिवली५१भूमिका : दोन नगरसेवकांचे निधन झाले असून ६ नगरसेवक भाजप सोडून शिवसेनेत आले. महापालिकेच्या राजकारणावर एकनाथ शिंदे यांचा पगडा असल्याने शिवसेनेतील बहुतांश नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदेची कास धरतील, असेच चित्र आहे.

 भिवंडी १२भूमिका : भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, शहरातील नगरसेवक वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. शिंदे की ठाकरे याबाबत उघड भूमिका येथील नगरसेवकांनी अजूनही घेतली नाही.

पश्चिम महाराष्ट्र 

 पिंपरी-चिंचवड ९भूमिका : शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिवसेनेबरोबर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ठाकरेबरोबरच राहणार आहोत.’’ 

 सोलापूर २१ (एकाचा मृत्यू)भूमिका : दोन नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. दोन नगरसेविका आणि एक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश त्याच्या तयारीत आहेत. उर्वरित १५ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.

 पुणे १० भूमिका : कोणीही बंड करू द्या कितीही ताकद दाखवावी पण आम्ही फक्त आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच आहे, असे पुण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी व शहराध्यक्ष संजय मोरे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

 कोल्हापूर  (त्यातील एकाने यापूर्वीच साथ सोडली आहे)भूमिका : तीनही नगरसेवकांनी आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

 सांगली ०२००८ पासून शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही.   

उत्तर महाराष्ट्र 

 नाशिक  ३३ भूमिका : अद्याप कोणीही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले नाही. 

 मालेगाव  १२भूमिका : अद्याप कोणीही जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अथवा विरोधात पुढे आलेले नाही. राज्यात आघाडी सरकार येण्यापूर्वीच मालेगाव महापालिकेत काँग्रेस-शिवसेना युतीची सत्ता होती, तर उपमहापौरपद शिवसेनेकडे होते.

 धुळे   ०२भूमिका : धुळे महापालिकेतील शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक हे ठाकरे घराण्याशी निष्ठावान आहेत. या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगितले आहे. 

 जळगाव अधिकृत १५ व भाजप बंडखोर २३भूमिका : महापौर जयश्री महाजन, ज्योती तायडे, ष्णू भंगाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे, तर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन बरडे यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. 

अहमदनगर  २५ भूमिका : जनतेतून निवडून आलेल्या २३ पैकी एकाही नगरसेवकाने स्पष्ट अशी भूमिका अद्याप घेतलेली नाही. मात्र, स्वीकृत नगरसेवक मदन आढाव यांनी शुक्रवारी स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. 

मराठवाडा 

 औरंगाबाद२८ + ०५ समर्थक अपक्ष, एकूण ३३ भूमिका : ९०% नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. पाच ते सहा नगरसेवक शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूक  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. त्यामुळे विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार शिंदे गटाकडे जाण्यास तूर्त तयार नाहीत. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यास बहुतांश नगरसेवक तिकडे जाऊ शकतात.

 नांदेड वाघाळा  ०१ भूमिका : आमदार बालाजी कल्याणकर हेच नांदेड महापालिकेमध्ये शिवसेनेचे एकमेव नगरसेवक आहेत आणि ते एकनाथ शिंदेसोबत गेले आहेत.

लातूर ०० भूमिका : लातूर महापालिकेची मुदत २५ मे रोजी संपलेली आहे. लातूर मनपामध्ये काँग्रेस ३३, भाजप ३६ आणि राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल होते. 

 परभणी ०५भूमिका : पाचही नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, तो अभेद्य आहे. कायमस्वरुपी आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहोत, अशी प्रतिक्रिया मनपातील शिवसेनेचे गटनेते चंदू शिंदे यांनी दिली.

विदर्भ  

 अमरावती  ०७भूमिका : सर्व नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा काहीही वाटा नसून कोणीही समर्थक नाही, अशी माहिती गटनेता प्रशांत वानखडे यांनी दिली. 

 अकोला  ०८भूमिका : सर्व नगरसेवक हे जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख यांच्यासोबत आहेत. नितीन देशमुख हे शिंदे यांच्या गटातून महाराष्ट्रात परतले आहेत. त्यांनी मी शिवसेनेसोबतच राहील असे स्पष्ट केले आहे. सर्व नगरसेवकांचीही तीच भूमिका आहे. 

 चंद्रपूर  ०१ भूमिका : चंद्रपूर महापालिकेत विशाल निंबाळकर व सुरेश पचारे हे दोन शिवसेना नगरसेवक होते. मात्र, निंबाळकर भाजपमध्ये गेले. त्यामुळे सुरेश पचारे हेच एकमेव सेना नगरसेवक आहेत. पचारे म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. शिंदे गटाशी आम्हाला काही देणेघेणे नाही.

 नागपूर  ०२भूमिका : शिवसेनेचे किशोर कुमेरिया व मंगला गवरे हे दोन्ही नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. या नगरसेवकांनी नुकतेच शिवसेना कार्यालयापुढे ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे