शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Eknath Shinde Devendra Fadnavis: आता बोला... CM एकनाथ शिंदेच म्हणाले, "महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी..." (Video Viral)

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 14:33 IST

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत

Eknath Shinde Video Viral: महाराष्ट्रात मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. राज्यात जेव्हा शिवसेनेत बंडखोरी झाली, त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री बनतील असा अंदाज बांधला जात होता. पण त्याउलट घडलं आणि सारेच अवाक झाले. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी, समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी फडणवीसांनी स्वत: कार चालवली व शिंदे शेजारी बसले होते. तेव्हादेखील, राज्याच्या सरकारचं स्टेअरिंग (निर्णय घेण्याची क्षमता) फडणवीसांकडेच आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला. त्यांच्या तोंडून जरी ही गोष्ट चुकून निघाली असली, तरी त्यावरून आता राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत हेच कदाचित एकनाथ शिंदे विसरले. मुंबईच्या गोरेगाव येथील कोकण महोत्सवा दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाषणात सुरुवातीला उल्लेख करताना 'राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी...' असे म्हटले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाहा नक्की एकनाथ शिंदे काय म्हणाले? (Video)

स्वत: एकनाथ शिंदे राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत. पण असे असताना स्वत:चेच पद विसरून किंवा अनावधनाने त्यांच्या तोंडून देवेंद्र फडणीवसांचा मुख्यमंत्री उल्लेख केला गेला. आधी विरोधकांकडून वारंवार टोमणे मारले जात असताना, असे घडणे म्हणजे नक्की काय, अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यावेळी, भाजपा श्रेष्ठींच्या या निर्णयाने फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. त्या निर्णयाचा राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनाही धक्का बसला होता. स्वतः देवेंद्र फडणवीस देखील शपथविधीच्या ठिकाणी काहीसे नाराज दिसून येत होते. मात्र सरकार अस्तित्वात आल्यानंतर, एकंदर कार्यशैली पाहता शिंदे यांच्यापेक्षा फडणवीसांनाच निर्णय घेण्याचे अधिक स्वातंत्र्य आहे अशी टीका विरोधक करताना दिसतात. अशा वेळी शिंदे यांच्या तोंडून असा उल्लेख चुकून होणे हा निव्वळ योगायोग जरी असला तरी अनेकांना यात पुढची समीकरणेही दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, या विषयावर दोन्ही नेते किंवा त्यांच्या पक्षाकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्री