शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

अभिनेता व्हायचे होते; पण नेता झालो! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 10:07 IST

शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडळकर यांचा लेख...

माझे वडील प्रभादेवीच्या बॉम्बे डाइंग मिलमध्ये कामाला होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. अनेकदा ते मीटिंगला सोबत नेत. तेथेच राजकारणाचे बाळकडू मिळाले. शाळेतील नृत्य, नाटकाची आवड कॉलेजमध्येही जपली. ‘देवनागरी’ एकांकिकेला राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. पण, या क्षेत्रात फार संधी नव्हती. कॉलेजमधील अभिनेत्री दीपाली सय्यद, नाट्य क्षेत्रात शीतल क्षीरसागर, दिग्दर्शक हॅरी फर्नांडिस, मार्केटिंग क्षेत्रात मोनिका गोडबोले यांनी नाव कमावले. खरं तर अभिनेता व्हायचे होते; पण नेता झालो. मित्रांच्या ‘स्नेहवर्धन’ त्रैमासिकासाठी कुर्ल्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलावंतांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून जनसंपर्क वाढला.

कुर्ल्याच्या शाकृपंत वालावलकर माध्यमिक विद्यालयात पूर्वीच्या विघ्नेश शाळेत शिक्षण झाले. चेंबूरच्या आचार्य कॉलेजमधून कला शाखेची पदवी घेतली. नंतर एअर इंडियात नोकरी. १७ वर्षे नोकरी केली. १९९६ला पर्मनंट झालो. त्याच वर्षी नेहाशी विवाह झाला. २००० मध्ये शाखाप्रमुख झाल्यानंतर राजकीय प्रवास सुरू झाला. आई, वडील, पत्नीने साथ दिली. कोणतेही काम करताना घरचे आणि मित्र यांच्या सल्ल्यानेच करत होतो. आजही तसेच करत असल्यामुळेच इथपर्यंत आलो, तीन वेळा आमदार झालो.

विधानसभेची २००९ ची निवडणूक दोन हजार मतांनी हरलो. २०१० साली वाढदिवसानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सहकुटुंब भेटलो. त्यांनी २०१४ च्या तयारीला लाग. कुर्ल्यातून तूच आमदार होणार हा आशीर्वाद दिला. मात्र, २०१२ साली मोठा अपघात झाला. त्यात वडील आणि पत्नीचे निधन झाले. हा मोठा आघात होता. त्यावेळी मोठा मुलगा यश १५ वर्षांचा होता, तर दुसरा जय १३ वर्षांचा होता. माझा एक पाय फ्रॅक्चर झाला. आई, बहीण, मित्रांची मोठी साथ मिळाली. यश आणि जय दोघेही स्वतंत्र व्यवसाय करताहेत. पुढे घरच्यांच्या आग्रहाखातर रजनीशी विवाह झाला. पण, तिचेही २०१९ मध्ये निधन झाले. 

जॅकेट घालायला संकोच वाटतो  जेवणाच्या ताटात जे वाढले असेल त्याला कधी नाही म्हणायचे नाही हे संस्कार आईने दिले. त्यामुळे जेवणात अमुक पदार्थ असावा असा आग्रह नसतो. तरी कोबीची भाजी, बटाट्याची भाजी, डाळ खिचडी हे आवडते पदार्थ आहेत. लहानपणापासूनच स्वच्छ कपडे घालण्याची सवय आहे. विशिष्ट ब्रँड, रंग आवडता असे नाही. मित्रांसोबत असताना जीन्स, टी-शर्ट, राजकीय कार्यक्रमात सफेद शर्ट, पॅन्ट, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सदरा, पायजमा असा पेहराव असतो. मात्र, जॅकेट फारसे आवडत नाही. अनेकदा कार्यक्रमाला जाताना जॅकेट सोबत नेतो; पण ते घालायला थोडा संकोच वाटतो. 

मित्राने डिपॉझिटचे पैसे भरलेपहिली निवडणूक हरल्यानंतर पुढची पाच वर्षे खूप अवघड गेली. त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीत मित्रांनी मोलाची मदत केली. निवडणूक अर्जांसोबत डिपॉझिट भरण्यासाठी पाच हजार रुपयेही नव्हते. एअर इंडियातील मित्राला फोन केला, त्याने बँकेत पैसे जमा केले. अनेक आव्हाने होती. काही मित्रांनी स्वतःचे दागिने विकून पैसे उभारले. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला, काम सुरू केले. पैसे, मित्र जमा होत राहिले आणि जेथून २००९ ला दोन हजार मतांनी हरलो त्याच मतदारसंघात २०१४ ला १४ हजार मतांनी विजयी झालो.  

कोंडवी गाव हेच आवडते ठिकाणराजकारणामुळे कुटुंबाकडे थोडे दुर्लक्ष होते. तरी त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो. पोलादपूरमधील कशेडी घाटाच्या पायथ्याजवळील कोंडवी हे आमचे गाव. चारही बाजूकडून डोंगर आणि मध्ये घर हेच आमचे आवडते निसर्गरम्य ठिकाण. पूर्वी कोंडवी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला होता. गावची ओढ जास्तच आहे. गणपती, शिमगा आणि इतर सणासुदीला सर्व कुटुंब तिथे एकत्र येतो. होळीला पालखी नाचवण्यात जी मजा आहे ती अन्य कशातच नाही.

टॅग्स :Mangesh Kudalkarमंगेश कुडाळकरMaharashtraमहाराष्ट्र