शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयांचा करणार फेरविचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:28 IST

 राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवर भाजपने टीकेची झोड उठविली होती. त्यात घोटाळ्यांचे आरोपदेखील केले होते. अशा निर्णयांच्या फायली तपासायची भूमिका नवीन सरकारकडून घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयांच्या चौकशीसाठी एखादी समितीदेखील नेमली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नवे सरकार फेरविचार करणार आहे. कोणत्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले होते, हेही तपासले जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

 राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवर भाजपने टीकेची झोड उठविली होती. त्यात घोटाळ्यांचे आरोपदेखील केले होते. अशा निर्णयांच्या फायली तपासायची भूमिका नवीन सरकारकडून घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयांच्या चौकशीसाठी एखादी समितीदेखील नेमली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

 आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय सरसकट बदलण्याची आमची भूमिका नसेल, पण राज्य सरकारचा निधी अनाठायी खर्च होत असून त्यात कंत्राटदारांचे हित साधले जात असल्याचे लक्षात आले तर अशा कामांना स्थगिती दिल्याशिवाय पर्याय नसेल असे गेल्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

 राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या दोन बैठकांमध्ये घेतलेले निर्णयदेखील तपासून बघितले जाणार आहेत. शेवटच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयासह अन्य काही धोरणात्मक निर्णयदेखील घेण्यात आले होते. एका बैठकीतील निर्णय हे नंतरच्या बैठकीत कायम केले जातात. त्यामुळे ठाकरे सरकारच्या शेवटच्या बैठकीतील निर्णयांवर शिक्कामोर्तब हे शिंदे यांच्या मंत्रिमंडळाला करावे लागणार आहे. 

शेवटच्या सात दिवसात ज्या पद्धतीने शेकडो शासन आदेश काढण्यात आले ते संशयास्पद असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयांच्या फायली आपल्याकडे पाठवा, असे आदेश आधीच राज्य सरकारला दिले आहेत. 

देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेवटच्या दिवसांतील निर्णयांचा फेरविचार नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनेदेखील केला होता आणि काही कामांना स्थगितीदेखील दिली होती.  

जलयुक्त शिवार योजना नव्या स्वरूपात परतणार! - nदेवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रॉजेक्ट’ असलेली जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. एवढेच नव्हे तर या योजनेची चौकशी करण्यासाठी माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांची समितीही नेमण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली. त्याचवेळी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीला जलसंधारण विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालात या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे लेखी सांगण्यात आले होते. त्यावरून वादळ उठले होते. - या पार्श्वभूमीवर, शिंदे सरकार नवीन स्वरूपात ही योजना पुन्हा राबवतील, अशी शक्यता आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ झाला, अनेक गावांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात केली हे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले होते. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना ३३ कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने राबविली. या योजनेची चौकशी महाविकास आघाडी सरकारने केली होती. ती आता गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा