शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे यांचा गट मनसेत सामील होणार? बंडखोर दिपक केसरकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 21:55 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

Maharashtra Political Crisis:  शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. पण, शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलिनीकरण करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे शिवसेनेच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे. 

पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईपासून वाचवायचे असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते, पण तो गट एखाद्या पक्षात विलिनी व्हावा लागतो. अन्यथा बहुमत असूनही कारवाई होऊ शकते, असे शिवसेनेचे वकील म्हणाले होते. यातच, शिंदे गट मनसेत सामील होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

दिपक केसरकर काय म्हणालेया सर्व चर्चांवर शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "आम्हाला कोणत्याच गटात सामील होण्याची आवश्यकता नाही, आम्ही शिवसेनेचा भाग आहोत. आमचा हा मूळ शिवसेनेचा गट आहे, जे उरलेले 14 आमदार आहेत त्यांनी कोणत्या गटात जायचं ते त्यांनी ठरवावं. आम्हाला कोणत्याच पक्षात जायची गरज नाही, आमचा मूळ पक्ष हा शिवसेनाच आहे" असं केसरकर म्हणाले. 

संजय राऊतांसारखा प्रवक्ता मिळू नये केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. 'बंडखोरी करणाऱ्या आमदरांचे शंभर बाप आहेत', असे वक्तव्य संजय  राऊत यांनी केले होते. याबाबत देखील दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ''संजय राऊत यांनी आमच्या मातांचा अपमान केलाय. कोणत्याही पक्षाला संजय राऊत यांच्यासारखा प्रवक्ता मिळून नये. पक्षासाठी रक्त सांडलेल्या लोकांची संजय राऊत नाचक्की करतात.  राऊतांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. संजय राऊत यांच्यासारखे प्रवक्ते मिळाले तर शिवसेना कधीच वाढणार नाही," असेही केसरकर म्हणाले. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMNSमनसे