शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

Eknath Shinde Shivsena Ajit Pawar | महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, शिवसेनेत नाराजी नाट्य पण अजित पवार कुठे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:44 IST

एकनाथ शिंदेंप्रमाणे २०१९ मध्ये अजित पवारांनी पुकारलं होतं बंड

Eknath Shinde Shivsena Ajit Pawar: राज्यसभा निवडणुकी पाठापोठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपाने पराभव केला. भाजपाचे पाच पैकी पाचही उमेदवार विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर आज महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता दिसत आहे. महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमधील सुरतच्या हॉटेलात शिवसेनेचे सुमारे २८-३० आमदार आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे. असाच प्रकार २०१९मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याबाबत घडला होता. त्यामुळे सध्याचा राजकीय गोंधळात अजित पवार नक्की कुठे आहेत, अशी चर्चा आहे.

२०१९ साली महाविकास आघाडी स्थापन होत असल्याच्या प्रक्रिये दरम्यान राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह अजित पवार बंडखोरी करून भाजपासोबत गेले होते. भाजपाने अजित पवार गटासोबत शपथग्रहण करून सत्तास्थापना केली होती. पण दीड दिवसांत ते सरकार पडले होते. आता एकनाथ शिंदे यांनी काहीशा तशाच पद्धतीचे बंड केले आहे. या साऱ्या गोंधळात, उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत, असा सवाल विचारला जात आहे. परंतु, राजकीय गोंधळात अजित पवार मात्र आपलं राज्याप्रति असलेले कर्तव्य पार पाडताना दिसत आहे. अजित पवार मंत्रालयातील कार्यालयात विविध बैठका घेण्याचे कार्यक्रम पार पाडत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंट वरून देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात नियमित कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली, असे लिहून त्या बैठकीचे फोटोही ट्वीट करण्यात आले आहेत.

--

ऑपरेशन लोटस सुरू झालंय का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत विजयी होणारे भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी, 'ही ऑपरेशन लोटसची महाराष्ट्रातील सुरूवात आहे का?', असा सवाल विचारण्यात आला.  त्यावर ते म्हणाले, "शिवसेनेमध्ये नक्की काय सुरू आहे ते आम्हाला माहिती नाही. आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत. पुढे काय होतंय पाहूया. आम्हालाही न्यूज आणि मीडियामधूनच या गोष्टी समजत आहोत. आम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत. खरं पाहता शिवसेना अजूनही दावा करते की त्यांची ३ मते फुटली आणि पराभव अपक्षांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. खरं तर शिवसेनेची १२ मते फुटली आहेत. कोण-कोण फुटले अशी नावं सांगू शकत नाही, पण हा शिवसेनेला मोठा धक्का आहे."

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी