शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

गुवाहाटीतून ४० आमदारांचे मृतदेह येतील; संजय राऊतांचं खळबळजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 13:09 IST

महाराष्ट्रात खरा बिग बॉस हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. गुलाब पाटलांची भाषण पाहिली तर शिवसेनेत हाच असं दिसला. तुझ्या मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, संदीपान भुमरे हा वॉचमेन होता, त्याला मुंबई माहिती नव्हती. हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता. आज त्याला मंत्री बनवले. शिवसेनेमुळे मी मंत्री झालो असे अश्रू उद्धव ठाकरे आणि माझ्यासमोर म्हटलं. हे अश्रू मगरीचे होते. गुवाहाटीचे हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर. महाराष्ट्रात खरा बिग बॉस हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. प्रकाश सुर्वे भाजी विकत होता त्याला पुन्हा भाजी विकायला लावू असंही त्यांनी सांगितले. 

तसेच मी हे संकट मानत नाही. शिवसेना ताकदीने पुढे नेऊ. यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावं लागेल. प्रकाश सुर्वे पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवले आहेत. बळी द्या असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात केले आहे. 

किरीट सोमय्या बेरोजगार झाले - राऊतकिरीट सोमय्यांचे नवल वाटतो. तो बेरोजगार झाला. प्रताप सरनाईक दिल्लीला गेले. गेले अनेक दिवस तुरुंगात पाठवणार असं बोलत होते. अशी कुठली वॉशिंग मशीन होती हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराची केस साफ झाली. सूरतहून थेट गुवाहाटीला गेले. ही कुठल्या ब्रॅँडची वॉशिंग मशीन आहे. माझ्यावरही ईडीची कारवाई झाली. राहतं घर जप्त केले. मालमत्ता जप्त झाली परंतु मी गुडघे टेकले नाही असंही संजय राऊत म्हणाले. मला अटक करा, मला अटक करण्याचे आजही प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे गटाचे नाव सांगत नाही तर मूळ बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगतो असा इशारा संजय राऊतांनी भाजपाला दिला. 

त्याचसोबत शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं हे गुलाबराव पाटील आहे. महानगरपालिका प्रचंड बहुमताने जिंकलो तर हे ४० चोर, रेडे कायमचे मातीत गाडले जातील. शिवसेनेत ही कीड कायमची संपून जाईल. अनेकांना शिवसेनेने खूप काही दिले. परंतु आता यापुढे होणार नाही. हे लोक कुठून येतात त्यांना पक्षात का आणलं जाते हे सगळं मी उद्धव ठाकरेंना सांगेन, आता फक्त शिवसैनिक आणि भगवा आहे. बंडखोरांनी एकमेकांचे कपडे फाडले. बंडखोर हे चड्डी बनियन टोळी झाली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना, ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगणारी शिवसेना आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठीची शिवसेना ती कुणालाही नष्ट करता येणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत