शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:52 IST

काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

मुंबई - राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे समर्थक ४० हून अधिक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मी मुख्यमंत्री नको असेन तर मला येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे. त्यातच आता शिंदे यांच्या बंडखोरीवरून काँग्रेसनं अजित पवारांना जबाबदार धरलंय का असा प्रश्न निर्माण होतो. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिवसेना-भाजपात लढाई झाली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमातून पुढे आले. सरकार जनतेसाठी काम करेल हा विचार होता. अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचं समोर येत होते. शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार त्रास द्यायचे या तक्रारी येत होत्या. काँग्रेस आमदारांनाही असाच त्रास होत होता. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला निधी मिळत नव्हता. हे सरकार जनतेसाठी होते एका पक्षासाठी नव्हतं. त्याचा विरोध आम्ही करायचो आणि हा विरोध स्वाभाविक होता असं त्यांनी सांगितले. 

तसेच काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली. आम्हाला सत्तेची लालसा नाही. काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला होता. आजही आमची विरोधात बसण्याची तयारी आहे. हिंदुत्व नाही ईडीचा विषय आहे. सगळ्यांना हे माहिती आहे. जनतेला सगळं ठाऊक आहे. ईडीच्या माध्यमातून भाजपा हा खेळ खेळत आहेत. सरकार ५ वर्ष चालेल. सत्तेसाठी भाजपा कुठल्या थराला जाऊ शकते हे दिसून येत असल्याचं सांगत नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले संजय राऊत?शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतु या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील घडामोडींवर भाजपाचं लक्ष"महाराष्ट्रातील घडामोडींवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील नेत्यांचे बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेतेमंडळी देखील या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मी याबद्दल आतातरी  काही बोलणार नाही. या साऱ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय असतील ते निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत", असं विधान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवार