शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

"बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत भूमिका घेतल्यानं उद्धव ठाकरेंना नैराश्य आलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 10:19 IST

आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. शिवसेना पोखरण्याचं काम महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून चाललं होतं ते आम्ही थांबवले असं शिंदे गटातील आमदारांनी म्हटलं आहे.

मुंबई - उद्धव ठाकरेंची मुलाखत दोन टप्प्यात पाहिली. सामनाचे संपादक संजय राऊत त्यांचेच प्रश्न, त्यांची उत्तरं, त्यामुळे मुलाखतीकडे फारसं गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ही मॅच फिक्सिंग आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचं आहे. एकनाथ शिंदेंबाबत समाजात मतभेद निर्माण करण्याचा केविळवाणा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांनी कधीही बाळासाहेबांशी, आनंद दिघेंशी तुलना केली नाही. नैराश्यापोटी उद्धव ठाकरे अशी विधाने करत आहेत असा टोला शिंदे गटातील आमदार शंभुराज देसाई यांनी लगावला आहे. 

शंभुराज देसाई म्हणाले की, बाळासाहेब आमचे दैवत आणि दिघे आमचे गुरू आहेत. परंतु केवळ लाखो शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांची भूमिका पटली आहे. त्यामुळे संभ्रम, नाराजी निर्माण करण्याचं काम मुलाखतीतून केले जात आहे. राज्यातील जनतेने एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. जेव्हा एकनाथ शिंदे राज्याच्या दौऱ्यावर जातील तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी रस्त्यावर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

एकनाथ शिंदेंवरील टीका दुर्दैवीएकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका अतिशय दुर्देवी आहे. २०१९ च्या निकालानंतर सत्तास्थापनेचा विषय पुढे आला तेव्हाचे रेकॉर्डिंग काढून बघा, सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन. परंतु जेव्हा हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा शेवटच्या २ दिवसांत नेमकं काय घडलं? ज्यामुळे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. किमान ५ ते १० वेळा एकनाथ शिंदेंनी आमदारांची भूमिका उद्धव ठाकरेंच्या कानी घातली होती. आमदारांची गळचेपी होत आहे काहीतरी निर्णय घ्या. परंतु उद्धव ठाकरेंनी कुठलाही निर्णय घेतला नाही. उलट ज्यावेळी आम्ही ही भूमिका घेतली तेव्हा मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांना चर्चेसाठी सूरतला पाठवले आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवायचं. त्यामुळे एकनाथ शिंदेंबाबत जे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे ते निराधार आहे. त्यात कुठलेही तथ्य आणि आधार नाही असं स्पष्टीकरण आमदार शंभुराज देसाई यांनी दिले. 

मविआच्या संख्याबळासाठी आम्ही चाललो अन् आता विश्वासघातकीआम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. शिवसेना पोखरण्याचं काम महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून चाललं होतं ते आम्ही थांबवले. सामान्य शिवसैनिकांच्या भावनेला वाचा फोडण्याचं काम केले. त्याला विश्वासघातकी म्हणतात. याच लोकांना घेऊन तुम्ही महाविकास आघाडी चालवली. संख्याबळाला आम्ही चाललो आणि आता बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन चाललो त्याला विश्वासघात म्हणत असाल तर ज्या बाळासाहेबांनी सांगितले होते मी माझ्या शिवसेनेला कदापि काँग्रेससोबत जाऊ देणार नाही. मुंबईत ज्याने बॉम्बस्फोट घडवले त्याच्याशी थेट संबंध असणाऱ्याशी राष्ट्रवादी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला बसवलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची विसंगत टोकाची भूमिका तुम्ही घेतली. त्यामुळे नैराश्येपोटी विश्वासघातकी, पालापाचोळा, गद्दार असे शब्द वापरण्यात आले असा टोला शंभुराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाShambhuraj Desaiशंभूराज देसाईSanjay Rautसंजय राऊत