शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

Eknath Shinde : "... त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय"; मविआच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 13:17 IST

Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी 'जोडे मारो' आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी 'जोडे मारो' आंदोलन करत आहे. मविआतर्फे हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जात आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

"विरोधक दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नको आहे. महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्यात, जातीजातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण महाराष्ट्रातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे. म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे."

"विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. लोकसभेत खोटं नरेटिव्ह पसरवून आरक्षण जाणार, संविधान बदलणार… हे होणार ते होणार सांगून लोकांमध्ये दहशत, भीती पसरवून मतं मिळवली. पण माणूस एकदा फसतो. पुन्हा पुन्हा फसत नाही" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे. 

"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. गावागावात शहराशहरात खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोहोचली आहे. दुर्देव बघा. एक काँग्रेसचा माणूस अनिल वडपल्लीवार कोर्टात आडवा झाला आहे. तो कुणाचा कार्यकर्ता आहे. कुणाचा पोलिंग एजंट आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने हायकोर्टातही याचिका केली. ती कोर्टाने फेटाळली. आता नागपूरला याचिका केली आहे."

"महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का? नवनीत राणांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणौतचं घर तोडलं. किती महिलांवर अन्याय केला... महाविकास आघाडी सरकारमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नये" असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज