शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंकडे नेमके संख्याबळ किती? सांगितला बहुमताचा आकडा, पुढच्या वाक्यावर सारे हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:10 IST

जे आमच्यासोबत मविआ सरकारमध्ये असताना घडले, ते मी कोणासोबत करणार नसल्याचे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, तर एकनाथ शिंदे असणार आहेत. फडणवीसांनी शिंदेंच्या नावाची घोषणा करून एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामुळे शिंदेंना मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखविला, तुम्ही करून दाखवा असे आव्हान देणाऱ्या शिवसेना नेत्यांची तोंडे आता गप्प झाली आहेत. असे असताना एकनाथ शिंदेंकडे नेमके संख्याबळ किती? याचे उत्तर खुद्द शिंदेंनीच सांगितले आहे. 

आम्हाला मविआ सरकारमध्ये अनेक अडचणी आल्या. निर्णय घेता येत नव्हते. आम्ही आवाज उठविला तरी देखील काही फरक पडला नाही. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. तुमच्या सारे समोरच आहे. भविष्याची चिंता आणि शिवसेना पक्ष टिकविण्यासाठी आम्ही नैसर्गिक आघाडीत परतलो आहोत, अशा शब्दांत शिंदे यांनी आभार मानले. 

याचबरोबर जे आमच्यासोबत सरकारमध्ये असताना घडले, ते मी कोणासोबत करणार नसल्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले. फडणवीस संख्याबळानुसार मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतू त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. आमच्याकडे आता भाजपाचे १३०, आमचे ५० आणि आणखी किती येतील माहिती नाही, अशा शब्दांत आपले संख्याबळ सांगितले. यावेळी एकच हशा पिकला. 

देवेंद्र फडणवीस मविआवर काय बोलले...२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं १०५ जागा आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. जवळपास १६१ युती आणि अपक्ष मिळून १७० बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस