शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून जळगाव महापालिकेच्या ‘सत्तांतर पॅटर्न’ची पुनरावृत्ती? मनपाचा पॅटर्न राज्यात यशस्वी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 12:37 IST

Eknath Shinde: मार्च २०२१ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार भाजपचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावून, जळगाव महापालिकेतील अडीच वर्षांची भाजपची सत्ता उलथवून लावली होती.

- अजय पाटील जळगाव : मार्च २०२१ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार भाजपचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावून, जळगाव महापालिकेतील अडीच वर्षांची भाजपची सत्ता उलथवून लावली होती. तसेच भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी आम्ही शिवसेनेत गेलो नसल्याचे सांगत, आम्हीच भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगत, भाजप गटनेतेपदावरदेखील दावा केला होता. आता हाच पॅटर्न राज्यातील सत्तांतराच्या राजकारणात एकनाथ शिंदेंकडून गिरवला जात असल्याची शक्यता आहे. 

वेगळा गट न स्थापता... म्हणजे शिवसेनेला मतदान करणाऱ्या भाजपच्या २७ नगरसेवकांनी वेगळा गट न स्थापन करता आमच्याकडे जास्त नगरसेवक असल्याने आम्हीच खरे भाजपचे नगरसेवक असल्याची भूमिका घेत भाजपचे जळगाव महापालिकेतील गटनेते भगत बालाणी यांची हकालपट्टी करीत दिलीप पोकळे यांना गटनेतेपद जाहीर केले होते. 

एकनाथ शिंदे यांची खेळी सद्य:स्थितीतील राजकीय घडामोडींत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच बंड पुकारले असून, त्यांनी आम्हीच शिवसेनेचे असून, शिवसेनेने नियुक्त केलेले गटनेते अजय चौधरी मान्य नसल्याचे म्हटले आहे.   

काय आहेत समान दुवे... १ महापालिकेत भाजपची सत्ता येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली होती. त्यानंतरच महापौरबदलाच्या वेळेसच भाजप नगरसेवकांनी बंड पुकारले. - महाराष्ट्रातील मविआची सत्ता येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना, शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारले. २ महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला समर्थन करून, महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसविला होता.- राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपला समर्थन देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

३ महापालिकेत बंडखोरी केल्यानंतर आमचा गट स्थापन झाल्याचा दावा करत, भाजप बंडखोर नगरसेवकांनी आम्हीच खरे भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगत थेट भाजपच्याच अधिकृत गटनेत्यांसह नगरसेवकांना व्हिप बजावला होता. तसेच त्यांनाही अपात्र करण्याची मागणी केली होती.आता शिवसेनेविरोधात बंड पुकारून आम्हीच शिवसेनेचे खरे आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांकडून केला जात असून, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाच  अपात्र करण्याची भूमिकादेखील एकनाथ शिंदेंनी घेतल्याची चर्चा आहे. 

४ जळगाव महापालिकेतील सत्तांतराच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे हेच होते. शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत यांनाही याबाबत माहिती न देता, सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. राज्यातील होऊ घातलेल्या सत्तांतराच्या केंद्रस्थानी आतादेखील एकनाथ शिंदे हेच आहेत. या बंडाबाबत त्यांनी मविआतील सहभागी पक्षनेत्यांसह शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांनाही दूर ठेवले. तसेच सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ५ जळगाव महापालिकेचे नेतृत्व हे जिल्ह्याचे भाजपचे सर्वोच्च नेते गिरीश महाजन यांच्याकडे होते. या सर्वोच्च नेत्याविरोधात जाऊन भाजपच्या नगरसेवकांनी बंड पुकारले होते. राज्याचे शिवसेनेचे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करतात. आता शिवसेनेच्या आमदारांनी थेट सर्वोच्च नेते असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना