शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण नको, कधीही प्रयत्न नाही; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर शिंदे गटाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 15:55 IST

उद्धव ठाकरेंनी कोणत्याही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही, असे माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत म्हणाले.

प्रत्येक निवडणूक ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊनच आम्ही लढत असतो. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय हा शिवसेना वाचविण्यासाठी घेतलेला आहे. त्यांनी कधीही शिवसेनेवर टीका केलेली नाही, कधीही धनुष्यबाण स्वत:ला मिळावा म्हणून प्रयत्न केलेले नाहीत. कुठेही निशानी घेण्याचा संबंध जोडण्यात येऊ नये. जनतेमध्ये संभ्रम राहू नये, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर आली आहे. 

उद्धव ठाकरेंनी कोणत्याही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही. काल परवाच्या बैठकीत आम्ही त्यावर बोललो आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेबांच्या कुटुंबावर टीका होऊ नये, एवढा त्यांचा आदर राखला जावा, असे आम्हाला सांगितले होते. आम्ही त्यांना तुमचा एखादा नेता असे बोलतोय हे निश्चित सांगू, असेही उदय सामंत म्हणाले. 

मातोश्रीचे दरवाजे उघडल्यावर त्यांनी आदित्य ठाकरे सामान्य शिवसैनिकांना भेटत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले. तसेच मंत्री पदावरून मी माझ्या वैयक्तिक कामांत होतो, मुंबई, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि परत मुंबई असा फेरा झाला. माझ्यावर महाराष्ट्राच्या सेवेची एखादी जबाबदारी टाकली तर मी ती निश्चितपणे पार पाडेन असे उदय सामंत म्हणाले. 

उद्धव ठाकरे काय म्हणालेले...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. "ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटत आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आदर वाटत आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडून बंडखोरांचे आभार व्यक्त केले. पण ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली त्यावेळी यातला एकही जण बोलला नव्हता. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का?, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना लगावला.   

"धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे जरी निवडणूक चिन्ह असलं तरी ते हाती घेतलेल्या लोकांचीही चिन्हं लोक लक्षात घेतात. माणसांना बघून लोक मतदान करत असतात. त्यामुळे मी जे बोललो त्याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करा असा अजिबात नाही. धनुष्यबाण कधीच कुणी शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना