शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लावला 'असा' अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:22 IST

शिंदे-फडणवीस सरकार तोपर्यंत चालणार जोवर त्यांच्याकडे १४५ चं बहुमत आहे असं अजित पवारांनी सांगितले.

शिर्डी - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही. ते कोसळेल हा दावा अनेकदा विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतु कुणीही डेडलाईन देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं २ दिवसीय अधिवेशन शिर्डीत होत आहे. यात जयंत पाटलांनी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला. मात्र त्यांच्या या दाव्यासाठी त्यांनी राजकीय अंदाज समोर ठेवला. 

जयंत पाटील म्हणाले की, जेव्हा शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाले तेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होत आहे. याठिकाणी जेव्हा जेव्हा कुठल्या पक्षाचं अधिवेशन झाले तेव्हा त्यावेळचं सरकार कोसळलं आहे असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटलांच्या विधानाला दुजोरा देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकार कोसळण्याचं भाकीत केले. 

शिंदे-फडणवीस सरकार तोपर्यंत चालणार जोवर त्यांच्याकडे १४५ चं बहुमत आहे. हा आकडा जसा जाईल राज्यातील सरकार कोसळेल असा दावा अजित पवारांनी केला. त्यासाठी २ संकेत त्यांनी दिले. त्यात सुप्रीम कोर्टात १६ आमदारांना अपात्र करण्याबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. जर कोर्टाने एकनाथ शिंदेंसह १६ जणांची आमदारकी रद्द केली तर शिंदे-फडणवीस सरकार अल्पमतात येईल आणि कोसळेल. दुसरं म्हणजे मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळात येण्यासाठी अनेक उत्सुक आहेत त्यामुळे मंत्री कुणाला बनवायचं यावरून शिंदे गटात पेच आहे. 

नाराजांना पुन्हा घेण्यासाठी ठाकरे गट सज्ज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दावा केला आहे की, शिंदे गटातील संजय शिरसाट यांच्यासह काही आमदार पुन्हा आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना परतायचं. मातोश्रीचे दरवाजे अद्याप कुणाला बंद झाले नाहीत असं सांगत अंधारे यांनी शिंदे गटातील नाराजांना साद घातली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी, ठाकरे गटातील अनेक नाराज आमदार भाजपाच्या आणि शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राहिलेल्या आमदारांना आपल्याकडेच ठेवण्यासाठी अशाप्रकारे अफवा पसरवली जात असून काही दिवसांत त्यांचेच आमदार आमच्याकडे येतील असा दावा खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस