शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP नेते एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितली कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 09:28 IST

सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात असं एकनाथ खडसेंनी म्हटलं.

बुलढाणा - सरकार केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही. सध्या अधांतरी आहे. अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर सर्व अवलंबून आहे. सरकारची निश्चिचता, अनिश्चितता कोर्टाच्या निर्णयावर आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदारांमध्ये असंतोष पसरला तर सरकारला त्यावेळीही धोका पोहचू शकतो. प्रत्येकाला अपेक्षा आहे त्यामुळे प्रत्येकाला संधी देणे अवघड आहे. त्यामुळे सरकार कोसळण्यासाठी बरीच कारणे आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. 

एकनाथ खडसे(Eknath Khadse) म्हणाले की, सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात. अलीकडे सरकारमध्ये येणारे संकेत पायदळी ठेऊनच निर्णय घेतो असं चित्र आहे. पण जे सरकार बहुमत असतं त्याचे निर्णय हे कायद्याने मान्यच असतात. काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी भक्कम आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार उभा केला जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे दोघांच्या चूका झाल्यातसेच स्व. बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या आयुष्यात धनुष्यबाणासाठी जी पुण्याई खर्ची केली. धनुष्यबाणानं त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या. सत्तास्थाने प्राप्त केली. परंतु दोघांच्या भांडणात धनुष्यबाणही मोडलं, शिवसेना नावही गेले. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना असं नावं आली. पुढच्या काळात या दोघांपैकी कुणाला यश येईल, अपयश येईल हा भाग वेगळा आहे. मात्र परंपरागत पिढीजात पुर्वजांनी कमावलेले नाव आणि चिन्ह दोघांनीही गमावलं आहे असं खडसे म्हणाले.  

त्याचसोबत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे पक्षप्रमुख होते. एखाद्या पक्षाचा प्रमुख १०० टक्के निर्भिडपणे काम करेलच असं नसतं. मग तो कुणत्याही पक्षाचा असो. कधी ना कधी चूक होऊ शकते. ती चूक दुरुस्तही होऊ शकते. उद्धव ठाकरेंकडूनही चुका झाल्या असतील परंतु इतक्या मोठ्या चुका नाहीत ज्यामुळे पक्ष मोडीत निघेल. आपल्याच घरात आग लावण्याचा हा प्रकार आहे. दोघांच्या हातातून चूका घडल्या आहेत. टोकाची भूमिका घेतली गेली. त्यामुळे आज धनुष्यबाण चिन्ह हे तात्पुरतं का होईना पण नामशेष झाल्याचं चित्र आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना