शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : 'बाळासाहेबांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले; तुम्ही संपत्तीचे अन् आम्ही विचारांचे वारसदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 20:49 IST

'बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण आमची संपत्ती आहे.'

खेड: खेडच्या गोळीबार मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी याच मैदानातून शिंदे गटावर टीका केली होती. त्या टीकेला शिदेंनी प्रत्युत्तर दिले. बाळासाहेबांनी ज्या लोकांना आपल्या जवळ केले नाही, तुम्ही अशा लोकांना जवळ केले. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस देशाचा पंतप्रधान करा, कलम 370 हटवतो. राम मंदिर बांधण्याचे स्वप्न बाळासाहेबांचे होते. आज राम मंदिरही बांधले जात आहे आणि कलम 370 हटवली गेली. बाळासाहेबांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले,' असे शिंदे म्हणाले.

तुम्ही संपत्तीचे तर आम्ही विचारांचे वारसदारते पुढे म्हणतात, काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला, या काँग्रेसला कधीही जवळ करू नका, असे बाळासाहेब म्हणायचे. हा बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची भूमिका होती. तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार सांगता, तुम्ही संपत्तीचे वारसदार आहात. आम्ही विचारांचे वारसदार आहोत. आम्हाला तुमची संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार, हीच आमची संपत्ती आहे. आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाले, हीच आमची संपत्ती आहे. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधीही जवळ केले नाही, अशा लोकांना तुम्ही जवळ केले. 

तुम्ही सत्तेच्या मोहासाठी त्यांच्यासोबत गेलाजो व्यक्ती आपल्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, तो देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो. जो राज्य जिंकू शकत नाही, तो पंतप्रधान कसा होऊ शकतो. अशा लोकांसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मत मागतो. अशी परिस्थिती तुम्ही राज्यात आणली. कशासाठी? सत्तेसाठी, खुर्चीसाठी...तुम्ही म्हणाला होतात की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू. पण, तुम्हाला सत्तेचा मोह झाला. आम्हाला आनंद वाटला. पण, नंतर तुम्ही हिंदुत्वाबद्दल मूक गिळून गप्प बसू लागलात. तुम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायलाही जीभ कचरू लागली. पूर्वी तुमचे सोनिया गांधी आणि शरद पवारांबद्दल काय विचार होते, हे सगळ्यांना माहित आहे. 2019 मध्ये काय झालं? सगळं जुनं विसरून गेलात. 

अशोक चव्हाणांनी शेण खाल्ल, तुम्हीही...अशोक चव्हाणांनी शेण खाल्ल असं तुम्ही म्हणाला होता. आज तुम्ही त्यांच्या पंगतीत बसून तेच शेण खात आहात. मीडियाला बाईट देताना अजित पवारांनी डोळा मारला. जे आज गळ्यात हात घालत आहेत, ते उद्या तुमचा गळा दाबतील. तुम्ही आम्हाला मिंध्ये म्हणता...हा एकनाथ शिंदे वफादार आहे. हा एकनाथ शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे. बैमानी माझ्या रक्तात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, तुमच्यासारखा सत्तेसाठी मिंध्या होणार नाही.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना