शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 13:51 IST

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ईडीचे अधिकारी राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील मैत्री बंगल्यावर झाडाझडतीसाठी पोहोचले होते. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ते औरंगाबाद जिल्हा दौऱ्यादरम्यान एका सभेला संबोधित करत होते.

नेमकं काय म्हणाले शिंदे? -संजय राऊतांना टोला लगावताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आवाज योतोय...? (जनतेतून आवाज - हो...) पुन्हा शिंदे म्हणाले, अरे तो भोंगा नीट करानारे बाबा… एक भोंगा गेला तिकडे आत... शिंदे यांनी पुन्हा विचारले, अरे आवाज योतो काय...? (जनतेतून आवाज - येतोय येतोय…), यावर पुन्हा शिंदे म्हणाले, अरे आता येणारच नाही, तो 8 वाजताचा भोंगा बंद झालाय." यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

या दौऱ्यादरम्यान, "संजय राऊत यांचे काय होईल? मला माहिती नाही. पण ते म्हणालेच आहेत ना, की कर नाही त्याला डर कशाला? यामुळे चौकशी होऊन जाऊ द्या. महाविकास आघाडीतील ते मोठे नेते होते. ईडीला घाबरून भाजपकडे जाणार नाही, असे ते म्हणत आहेत. त्यांना कुणीही बोलावलेले नाही. ईडीच्या कारवाईने कुणी आमच्याकडे येत असेल तर, म्हणजे शिवसेना-भाजपकडे येऊ नका. अर्जुन खोतकर किंवा अन्य कुणीही, ईडीला घाबरून येऊ नका, हे पुण्याचे काम करू नका. केंद्रीय तपास यंत्रणेने यापूर्वीही तपास केलेले आहेत. चुकीचा तपास केला असता तर न्यायालयाने संबंधितांना दिलासा दिला असता, " असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एवढेच नाही, तर आमच्याकडे आलेल्या आमदार, खासदारांपैकी एकाने तरी ईडीच्या कारवाईमुळे आल्याचे सांगितले का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

शिवसेना फोडण्याचं पाप राऊतांनी केलं -संजय राऊतांच्या अटकेसंदर्भात बोलताना शिंदे गटाती आमदार संजय शिरसाट म्हणाले, "काल ईडीच्या कारवाईवेळी संजय राऊत जे हातवारे करत होते ते अतिशय चुकीचे होते. ईडीची कारवाई सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरही झाली. परंतु, अशा अविर्भावात ते वागले नाहीत. संजय राऊतांना त्यांची लायकी आज कळेल. ज्यांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्या कर्माची ही फळे आहेत. संजय राऊत हा त्यांचा प्यादा होता, या प्यादाचे काम आता संपले आहे. शिवसेना फोडण्याचे काम राऊतांनी केले. संजय राऊत शिवसेनेसोबत होते की राष्ट्रवादीसोबत होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होते, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय