शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 17:48 IST

 एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान,  एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे अजित पवार हे नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांची नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामागचे कारण आहे काय, असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.  

दरम्यान, वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवाला विविध राजकीय नेते, बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतू अजित पवार तिकडे गेले नव्हते. तेव्हापासून अजित पवार नाराज असल्याचा चर्चा होत्या. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा अजित पवार गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांना आणखी उधाण आले. अजित पवार हे देवगिरी बंगल्यावर होते. तरीही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला का आले नाहीत? तर यामागे ते आजारी असल्याचे सांगण्यात आले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी अजित पवार यांच्या गैरहजेरीबद्दल प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते बैठकीला येऊ शकले नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अजित पवारांची तब्येत आज ठीक नाही आहे. त्यामुळे ते कॅबिनेट बैठकीला आलेले नाहीत. त्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पण राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारdelhiदिल्ली